हिरवी सिमला मिरची तुम्ही पाहिली असेल व खाल्ली असेल परंतु लाल आणि पिवळी सिमला मिरची पाहिली आहे का? सिमला मिरचीचा वापर प्रत्येक घरात केला जातो. त्याची लागवड देशात केली जाते. या पिकातून तुम्हाला चांगले पैसे मिळतील.
जर तुम्ही शेतकरी असाल व हिरव्या सिमला मिरचीची लागवड करत असाल, तर आता तुम्ही लाल आणि पिवळ्या रंगाच्या सिमला मिरचीची लागवड करण्यास सुरुवात करा. तुम्हाला या सिमला मिरची पासून देखील खूप चांगले उत्पन्न मिळू शकेल. ही सिमला मिरची देखील खूप ठिकाणी वापरण्यात येते. यामध्ये अनेक जीवनसत्व देखील असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. सिमला मिरची मध्ये फायबर देखील मुबलक प्रमाणात असते .त्यामुळे याची मागणी बाजारामध्ये खूप प्रमाणात असते. या सिमला मिरचीचा वापर लग्नाच्या कार्यक्रमापासून सप्ततारांकित हॉटेलमध्ये केला जातो.
लाल व पिवळ्या सिमला मिरची १५० ते २०० किलोचा भाव
बाजारामध्ये हिरव्या सिमला मिरचीची किंमत 50 रुपये किलो असेल. तर लाल व पिवळ्या सिमला मिरची किंमत दीडशे ते दोनशे रुपये पर्यंत असते .त्याच्या लागवडीसाठी प्रथम रोप वाटिका तयार केली जाते. रोपवाटिकेत साधारण महिन्याभरात रोपे तयार होतात. त्यानंतर शेताची पाच वेळा नांगरणी केली जाते .यानंतर जमीन सपाट करून दोन दोन फूट अंतराने सिमला मिरचीची रोपे लावली जातात .
दोनच महिनात येणारे पीक
सिमला मिरचीची लागवड केल्यानंतर पाण्याचा निचरा होण्यासाठी शेतात उत्तम व्यवस्थापन करणे गरजेचे असते. दोनच महिन्यात पीक तयार होते. याशिवाय पॉलिहाऊस मध्ये सिमला मिरचीची लागवड केल्यास ते अधिकच चांगल्या प्रकारे ती सिमला मिरची येते. पॉलिहाऊस मध्ये शेती केल्याने जोरदार वादळ किंवा पाऊस पासून पिकाचा बचाव होतो सुमारे एक एकर मध्ये सिमला मिरची लागवड केल्यास 15000 किलो उत्पादन मिळते .याची विक्री करून शेतकरी लाखो रुपये कमवू शकतो.