कधी जमा होणार PM किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता?

कधी जमा होणार PM किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता?

14 वा हप्ता  कधी येणार याबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पीएम किसान  सन्मान निधीचा  चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. अशी शक्यता वर्तवली आहे. मात्र अद्यापही कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही .ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कोणते कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही . अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर  पूर्तता  करून घ्यावी. असे आव्हान करण्यात आले आहे.

कागदाची पूर्तता करण्याची शेवट दिनांक 23 जून आहे. त्या अगोदर या कागदाची पूर्तता शेतकऱ्यांनी करून घ्यावी .जे शेतकरी आधीच किसान  सन्मान निधी या योजनेशी संबंधित आहेत. परंतु ईकेवायसी पूर्ण झालेली नाही अशा शेतकऱ्यांनी देखील ईकेवायसी पूर्ण करून घ्यावे.  याचबरोबर या योजनेत शेतकरी  नुकतेच सहभागी झालेले आहे. अशा देखील शेतकऱ्यांनी  ई केवायसी करणे बंधनकारक आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यातील 42 हजार शेतकऱ्यांचा पंतप्रधान निधी हप्ता बंद होऊ शकतो .अशी माहिती मिळाली आहे. 

27 फेब्रुवारीला 13 वा हप्ता  मिळाला होता.

गेल्यावेळी 27 फेब्रुवारीला शेतकऱ्यांना 13 वा हप्ता मिळाला होता. त्यामुळे केंद्र सरकारकडे 14 हप्ता मिळण्यासाठी जुलै 2023 पर्यंत वेळ आहे. अशा परिस्थितीतच केंद्रीय सरकारने 14 हप्त्याचे पैसे  जून ते जुलै दरम्यान कधीही शेतकऱ्यांना पाठवू शक्यता याच महिन्यात म्हणजे जून महिन्यामध्ये 14 वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

कशी कराल ऑनलाईन इ केवायसी

जे शेतकरी इंटरनेटचा वापर करतात व त्यांना ऑनलाईन पद्धत माहिती आहे ते शेतकरी ऑनलाइन माध्यमातून केवायसी करू शकतात.

–  सगळ्यात आधी तुम्हाला पीएम किसान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईट  pmkisan.gov.in  वर जावे लागेल .
– या वेबसाईटवर E-KYC पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे .
– E-KYC पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे .
– यानंतर PM किसान सन्मान निधीशी जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्यावर ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाकावा व सबमिट पर्यायावर क्लिक करावे .
– या प्रक्रियेनंतर तुमची केवायसी पूर्ण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *