23 जूननंतर पावसाची शक्यता ,बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर, हवामान विभागाचा अंदाज.

23 जूननंतर पावसाची शक्यता

गुजरातला धडकलेल्या बिपरजॉय’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण देशाच्या हवामानावर होत आहे .या चक्रीवादळाचाच परिणाम म्हणून काही भागांमध्ये ऊन तर काही भागांमध्ये पावसाची स्थिती आहे. यामुळेच मान्सून पुन्हा एकदा लांबण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे .आता मान्सून 23 जून नंतर येईल अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.

चक्रीवादळामुळे अधून मधून पावसाची हजेरी.

सध्या राज्यामध्ये चक्रीवादळामुळे अधून मधून पाऊस काही भागांमध्ये येत आहे. मान्सून हा 23 जून नंतर महाराष्ट्र आणि मध्य भारतामध्ये येण्याची शक्यता आहे. दक्षिण आणि ईशान्य भारतामध्ये 18 ते 21 जून च्या दरम्यान पावसाच्या सरी कोसळतील.

पाऊस आणखीन रखडण्याचे चिन्ह

या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता नाही अशी माहिती हवामान खात्याने दिली. मात्र दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून पुढील आठवड्यात जोरदार पाऊस होईल. असे हवामान खात्याने सांगितले आहे. चक्रीवादळामुळे लांबणीवर गेलेला पाऊस हा आणखीन रखडण्याचे चिन्ह दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी योग्य काळजी घेण्याचं आवाहन विभागाकडून करण्यात आलेले आहे.

मान्सून स्थिर झाल्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली

मान्सून पुन्हा एकदा लांबणीवर वर गेल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यात अनेक भागात मान्सून अद्याप दाखल दाखल झालेला नाही .मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसानं हजेरी लावलेली आहे. मराठवाड्यामधील शेतकरी देखील पावसाच्या प्रतीक्षेत आहेत शेतकऱ्यांना अजून पावसाची वाट पहावी लागणार आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने

महाराष्ट्र मध्ये यंदा पाऊस उशिराने दाखल झाला असून जून चे पंधरा दिवस उलटले तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसासाठी पुन्हा 23 जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे .आता  बिपरजॉय चक्रीवादळ  राजस्थानच्या दिशेने पुढे सरकत आहे. 20 जून पर्यंत पश्चिम किनारपट्टीवर आणि मध्य भारतात सक्रिय होण्याची परिस्थिती पावसाची दिसत आहे.

शेतकऱ्यांच्या डोक्यावर चिंतेचे काळे ढग

जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनचे आगमन होत असते परंतु यावर्षी मान्सूनची प्रगती ही मंदावली आहे. निम्मा जून उलटून गेला तरी मान्सूनची प्रगती झालेली नाही .सर्व शेतकरी मान्सूनची प्रतीक्षा करत आहेत. जून महिन्यामध्ये एकदा पावसाचा खंड झाला की संपूर्ण खरीप हंगामा वर वाईट परिणाम होतो मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर चिंतेचे काळे ढग आता अधिकच गडद होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *