सोयाबीनच्या या वाणाची करा लागवड हेक्टरी मिळते 40 क्विंटल उत्पादन ,वाचा सविस्तर …

यंदाच्या खरीप हंगामामध्ये जर तुम्हीही सोयाबीन लागवडीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच महत्वाची असणार आहे. खरेतर यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून कालावधी मध्ये सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.

आपल्या महाराष्ट्रात सुद्धा या वर्षी सरासरी पेक्षा जास्तीचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे . हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार यंदा मान्सून वेळेच्या अगोदर दाखल होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे .

यामुळे सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र यावर्षी काहीसे वाढणार असा विश्वास आहे. जर तुम्हाला सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची लागवड करणे गरजेचे असणार आहे.

दरम्यान आज आपण या लेखाच्या माध्यमातून सोयाबीनच्या अशा एका सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत ज्याच्या लागवडीतून हेक्टरी 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार आहे.

मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही भागात सोयाबीन हे उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीन या पिकाला नगदी पिकाचा अर्थातच कॅश क्रॉपचा दर्जा मिळालेला आहे. मात्र हे पीक मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना परवडत नाही .

याचे पहिले कारण म्हणजे सोयाबीनला बाजारात अपेक्षित इतका दर मिळत नाहीये आणि दुसरे म्हणजे पाहिजे तेवढे असे सोयाबीन पिकातून उत्पादन मिळत नाहीये.या कारणामुळे आज आपण सोयाबीनच्या विक्रमी उत्पादन देणाऱ्या जातीची माहिती पाहुयात …

एन.आर.सी. ३७ (अहिल्या -४)

भारतामध्ये शेतकरी सोयाबीनच्या अनेक जातींची शेती करत असतात . आपल्या महाराष्ट्रात देखील शेतकरी बांधव वेगवेगळ्या जातींची लागवड करत असतात . तसेच आज आपण 2017 मध्ये प्रसारित करण्यात आलेल्या एका जातीची माहिती पाहणार आहोत.

आज आपण एन.आर.सी. ३७ (अहिल्या -४) या जाती विषयी जाणून घेणार आहोत. कृषी तज्ञांच्या माहितीनुसार २०१७ मध्ये सोयाबीनची ही जात भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर येथे प्रसारित झाली आहे.

सोयाबीन उत्पादकांमध्ये तेव्हापासून ही जात खूपच लोकप्रिय आहे. कारण की या जातीपासून शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पादन मिळत आहे.या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते असा दावा कृषी संशोधकांनी केला आहे.

विशेष म्हणजे सोयाबीनची ही जात आपल्या महाराष्ट्रात लागवडीसाठी अनुकूल आहे. महाराष्ट्र ,मध्य प्रदेश, आणि राजस्थान या राज्यांमध्ये या जातीची शिफारस केली आहे. या जातीचे पीक ९६ ते १०२ दिवसांमध्ये परिपक्व होत असल्याची माहिती कृषी संशोधकांनी दिली आहे.

Leave a Reply