पीएम किसान योजनेच्या रकमेत होणार वाढ, पहा सविस्तर माहिती!

Pm kisan yojana:

पी एम किसान योजनेत मोठे बदल होणार आहेत या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेवर वाढ होणार असल्याचा दावा केला जात आहे. एका मीडिया रिपोर्ट नुसार या केंद्रीय प्रस्तुत योजनेत आता दोन हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.जसं की आपणास ठाऊकच आहे.या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना दिले जातात मात्र हे सहा हजार रुपये हे आपले सरकार एकदा न देता तीन वेळेस देत असते.म्हणजेच तीन हप्त्याच्या स्वरूपात आपले हे पैसे पडतात आता मात्र हे सहा हजार रुपये न राहता आपले सरकार आता आपल्याला आठ हजार रुपये वार्षिक मदत देणार आहे.

म्हणजेच हे आठ हजार रुपये आपल्याला चार हप्त्याच्या स्वरूपात भेटणार आहेत म्हणजे जसे की पहिले चार महिन्यानंतर एक हप्ता पडत होता आता तीन महिन्यानंतर एक हप्ता पडणार आहे आपल्या शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा केल्या जाणार आहे असे एका मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात आले आहे.मात्र या योजनेअंतर्गत एका वर्षाच्या हप्ते प्राप्त शेतकऱ्यांना मिळणार आहेत असे याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही घोषणा  करण्यात आलेली नाही.परंतु सहा हजार रुपयांच्या ऐवजी या योजनेत आठ हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र सरकार काही दिवसात करू शकते यासाठी काही तज्ञ लोकांनी देखील पाठपुरावा केलेला आहे.

या तज्ञ लोकांनी केला पीएम किसान योजनेचा पैसा वाढवण्यासाठी पाठपुरावा :

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य आर्थिक सल्लागार सोम्या कांती घोष यांनी त्यांच्या संशोधन निबंधात पी एम किसान चा पैसा पुढील पाच वर्षात 6000 रुपये पासुन 8000 पर्यंत वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.तसेच नॅशनल फार्मर प्रोग्रेसिव्ह असोसिएशनचे अध्यक्ष स्वामीनाथन फाउंडेशन ने सुद्धा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये बदल करण्याचा आणि योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या 6000 रुपयांच्या लाभाला 1500 रुपये प्रति वर्ष करण्याची मागणी केली आहे.

एम स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथ फाउंडेशनने सुद्धा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या वार्षिक 24 हजार रुपये करण्याची सूचना मांडली आहे.देशाचे माजी राज्य अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी यांनीही पंतप्रधान किसान योजनेची प्रोत्साहन रक्कम सहा हजार रुपये वरून 12 हजार रुपये पर्यंत वाढवण्याची सूचना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *