पंतप्रधान पिक विमा योजना लाभ राज्यातील शेतकऱ्यांना फक्त एका रुपयात घेता येणार आहे ही योजना नेमकी काय आहे कोणत्या पिकांना कसा विमा मिळेल याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
ही योजना काय आहे
अन्नधान्य आणि गळीत पिकांसाठी खरीप हंगामामध्ये विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. रब्बी हंगामामध्ये विमा सुरक्षित रकमेच्या दीड टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. तसेच नगदी पिकांसाठी खरीप आणि रब्बी हंगामात विमा सुरक्षित रकमेच्या पाच टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते. मात्र आजवर या योजनेचा लाभ घेता ना शेतकऱ्यांना संपूर्ण स्वहिस्सा भरून पीक विमा संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी लागत असे, परंतु आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार एक रुपयात शेतकऱ्यांना नोंदणी करता येईल. शेतकऱ्यांच्या हिश्याची उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे.
ही योजना केंद्राची का राज्याची
या योजनेसाठी केंद्र सरकार कोरडवाहू क्षेत्रासाठी विमा रकमेच्या तीस तर बागायती क्षेत्रासाठी विमा रकमेच्या 25% मर्यादित आपला हिस्सा भरणार आहे. उर्वरित रक्कम राज्य सरकारला भरायची आहे . राज्यात 2016 पासून खरीब हंगामात पंतप्रधान पिक विमा योजना राबवण्यात येत होती. पण राज्य सरकारने 2023- 24 पासून सर्व समावेश पिक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतला, व त्यानुसार शेतकऱ्यांना फक्त आता एक रुपयात विमा हप्ता भरून पिक विमा संकेतस्थळावर नोंदणी केल्यास उर्वरित फरक सर्वसाधारण’ विमा हफ्ता अनुदान’ समजून राज्य सरकार अदा करणार आहे.
शेतकऱ्यांना कधीपर्यंत नोंदणी करता येईल.
खरीप हंगामातील पिकांना पिक विमा घेण्यासाठी 31 जुलै पर्यंत पिक विमा संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. रब्बी हंगामातील पिकांना पिक विमा घेण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव नसल्यास बोगस भाडेकरार किंवा बोगसपणे कुळाने शेती करत असल्याचे दाखवून बोगस पीक विमा काढल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
हा विमा कोणत्या कोणत्या पिकांसाठी आहे
तृणधान्य कडधान्य पिकांसाठी खरीब हंगाम भात, खरीप ज्वारी ,बाजरी, नाचणी ,मूग, उडीद, तूर ,आणि मका उन्हाळी भात ,गळीत धान्यांसाठी खरिपात भुईमूग ,कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन , नगदी पिकांसाठी खरीप हंगामात कापूस, खरीप कांदा ,तसेच रब्बी हंगामात गहू जिरायती, रब्बी ज्वारी ,हरभरा, उन्हाळी भुईमूग, या पिकांसाठी विमा योजना आहे . ई पीक पाहणीत नोंदवलेले क्षेत्र आणि प्रत्यक्षातील क्षेत्र या तफावत आढळल्यास ही पिक पाहण्यातील क्षेत्र गृहीत धरले जाणार आहे.
कोण कोणत्या जोखमीसाठी विमा.
पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान. पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग ,वीज कोसळणे ,गारपीट वादळ चक्रीवादळ पूर शेती जलमय होणे . दुष्काळ ,पावसातील खंड, कीड रोग, इत्यादी कारणांमुळे हंगामाच्या अखेरीस उत्पादनात येणारी घट स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान नैसर्गिक कारणांमुळे शेतीमालाचे होणारे नुकसान यासाठी विमा उतरवला जातो.