राज्यामध्ये पुढील चार दिवस काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आज कोल्हापूर ,रत्नागिरी, सातारा ,रायगड ,व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पाऊस याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे .
या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच पुणे व ठाण्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पावसाचा जोर आज मुंबईत कमी असेल, मात्र 5 जुलैपासून पुढील तीन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यातही पुढील चार दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.