परभणीतील बाजारपेठेत, कापूस दरात सुधारणा.

परभणीतील बाजारपेठांत कापूस दरात सुधारणा

जिल्ह्यातील मानवत, सेलू ,परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये कापसाची आवक कमी झाली असून, लिलावा द्वारे होणाऱ्या कापूस खरेदी दरात सुधारणा झाली आहे .मागील दोन दिवसात कापसाच्या दरात क्विंटल मागे दीडशे ते चारशे पन्नास रुपयांची सुधारणा झाली आहे.

सोमवारी मानवत बाजार समितीत कापसाच्या 110 ते 120 गाडी आवक होती. कापसाला प्रतिक्विंटल किमान 6000 ते कमाल 7415 तर सरासरी7300 दर मिळाला . सेलू बाजार समितीमध्ये कापसाला प्रतिक्विंटल किमान 6250 ते कमाल 7410 रुपये तर सरासरी 7350 रुपये दर मिळाला . परभणी मधील बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल किमान 7000 ते कमाल 7435 रुपये तर सरासरी 7400 दर मिळाला आहे.

मानवत बाजार समितीमध्ये शनिवारी कापसाची  2300 क्विंटल  आवक होऊन प्रतिक्विंटल किमान 6000 ते कमाल 7375 रुपये तर सरासरी 7250  रुपये दर मिळाला.शुक्रवारी (दिनांक 30) कापसाची १६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटला किमान 6000 ते कमाल 7190 तर सरासरी 7100  दर मिळाला .तर बुधवारी 600 क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान 6000 ते कमाल 6950 तसेच सरासरी 6825 एवढा दर मिळाला.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत मानवत बाजार समितीमध्ये कापसाची आवक कमी झाली असून दरात चढ-उत्तर सुरूच आहेत .किमान दर 6000 रुपयांवर स्थिर आहेत .कमालदारात दीडशे ते चारशे रुपयांची सुधारणा झाली आहे. सेलू बाजार समितीमध्ये शनिवारी कापसाची १७८९ आवक होऊन प्रतिक्विंटनला 6405 ते 7310 रुपये इतका दर मिळाला .तर सरासरी  7260 रुपये दर मिळाला.परभणी बाजार समिती टीएमसी मार्केट यार्डावर शनिवारी कापसाला प्रतिक्विंटल किमान 7300 तर कमाल 7450 रुपये दर सरासरी सात हजार चारशे रुपये दर मिळाला.

किमान आठ हजार रुपये दराची अपेक्षा

परभणी मधील बाजारपेठेत काही  आठवड्यापासून कापसाचे कमाल दर साडेसात हजाराच्या आतच होते या दरामध्ये किंचित सुधारणा झाल्यास आवक वाढते ,व आवक वाढल्यानंतर दर कमी होत आहेत. आवक कमी झाल्यानंतर परत दरात थोडी सुधारणा होते .असे आजवरचे चित्र आहे .किमान 8000 रुपये दर मिळतील या अपेक्षणी अजूनही अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्री केलेली नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *