शेतकऱ्यांना दिलासा , लासलगावमध्ये डाळिंब प्रति कॅरेट २०११ रुपये भाव..

शेतकऱ्यांना दिलासा , लासलगावमध्ये डाळिंब प्रति कॅरेट २०११ रुपये भाव

सध्या डाळिंब उत्पादकांचे चांगले दिवस आले आहेत नाशिक मधील लासलगाव बाजार समितीमध्ये गेल्या नऊ वर्षापासून डाळिंबाचे लिलाव सुरू झाले आहेत.

आता येथे डाळिंब लिलावास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी दिवसभरामध्ये 299 कॅरेट आवक झाली. प्रति कॅरेट किमान 200 ते 5100 व सरासरी 2011 रुपये याप्रमाणे दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

डाळिंबाच्या कॅरेटला सरासरी 2011 रुपये एवढा भाव मिळाला आहे .यामध्ये वजन मापानंतर लगेच रोख पेमेंट देण्यात येणार आहे.

जवळपासच्या परिसरातील मालाच्या विक्रीची सोय व्हावी यामुळे या बाजार समिती मार्फत गेल्या नऊ वर्षापासून डाळिंबाचे लिलाव करण्यात येत आहेत.

या ठिकाणी चांदवड, सटाणा, येवला, देवळा, मालेगाव, कळवण ,सिन्नर ,नगर, जिल्ह्यातील कोपरगाव ,राहुरी, राहता, व नेवासा, येथून डाळिंब येत आहेत .येथील परिसरामध्ये सध्या भरपूर डाळींब उत्पादक शेतकरी झाले आहेत. 

 

Leave a Reply