soybean bajarbhav : तेलाच्या आयातीमुळे दर घसरले, सोयाबीनच्या बाजारभावावरही परिणाम

soybean bajarbhav : या आठवड्याच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी दिनांक १६ सप्टेंबर रोजी सोयाबीनची खरेदी सुरू झाली तेव्हा दरांमध्ये फारशी वाढ झाल्याचे दिसून आले नाही. राज्यातील बाजारात सोयाबीनचे दर सरासरी ४ हजार ते ४१०० रुपयांच्या आसपास राहिले.

अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनला प्रति क्विंटल ४२७५ रुपये, यवतमाळमध्ये ४ हजार, हिंगणघाट येथे ३४००, चिखलीत ४२३१रु. कारंजा येथे ४ हजार, हिंगोलीत ३८०० रुपये, सेलू येथे ४१०० रुपये सरासरी दर होता. एक दोन बाजारात हमीभाव केंद्रामुळे दर ४८९२ असा होता.

खाद्यतेल आयात ३९ टक्क्यांनी वाढली
सध्या सोयाबीन तेलाची बंदरावरील किंमत ही १२४ रुपये प्रति किलो, तर पामतेलाची किंमत १३४ रुपये अशी आहे. परिणामी लोक सोयाबीन तेलाला पसंती देत आहेत. मात्र तरीही पाहिजे तशी मागणी नसल्याने तेलाच्या किंमती कमीच असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मागच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये देशाची खाद्यतेल आयात सुमारे ३९ टक्क्यांनी वाढली आहे. थेट परिणाम खाद्यतेलांच्या आणि तेलबियांच्या किंमतीत घसरण होण्यात झाला आहे. दरम्यान मागच्या आठव्‌ड्यात तेलाची मागणी कमी असल्याने दर आणखी घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पामतेलाच्या किंमती घसरल्या आहे. त्यात शुक्रवारी म्हणजेच १३ डिसेंबर रोजी सोयाबीन तेलावरील आयातशुल्कात सरकारने वाढ केली. तसेच पामतेल आणि पामोलिनवरील आयातशुल्कही वाढवले. पण आधीच आयात केलेला साठा जास्त असल्याने त्याचा फार उपयोग होत नसल्याचे दिसते. परिणामी सोयाबीनचे बाजारातील दर अजूनही कमीच दिसत आहेत.

मध्य प्रदेशातही भाव घटले
मध्यप्रदेश हे देशातील क्रमांक एकचे सोयबीन उत्पादक राज्य मानले जाते. उजैन, नीमच या परिसरात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादक घेतले जाते. त्यामुळे या राज्याला सोया स्टेट असेही संबोधले जाते. मात्र यंदा अवकाळी पावसाने येथील सोयाबीन उत्पादकांना एकरी एक ते दोन क्विंटलचा फटका बसला आहे. असे असूनही येथील शेतकऱ्यांना सध्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहेत. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मध्यप्रदेशातील सोयाबीनचे बाजारभाव हे ४ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *