कर्नाटकमध्ये मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक हवामान …

कर्नाटकमध्ये मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक हवामान ...

बिपॉरजॉय  चक्रीवादळाची अरबी समुद्रातील तीव्रता कायम आहे.  हे चक्रीवादळ हळूहळू उत्तरेकडे सरकत असल्या कारणामुळे मान्सूनला पोषक हवामान तयार झालेले आहे . दिनांक दहा कर्नाटकच्या काही भागांमध्ये, बंगालचा उपसागर तसेच ईशान्य भारतातील राज्यांमध्ये ,अरबी समुद्र ,यामध्ये मोसमी वाऱ्याची प्रगती होत आहे .असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 

बिपॉरजॉय  चक्रीवादळाची निर्मिती दि.6  मंगळवारी अरबी समुद्रात झाली हे वादळ अरबी समुद्रामध्ये अति तीव्र झालेले आहे. शुक्रवारी वारे गोव्याकडून पश्चिमेला 800 किलोमीटर ,तसेच मुंबईपासून 820 किलोमीटर नैऋत्यकडे, तर गुजरातच्या पोरबंदरापासून 830 किलोमीटर दक्षिणेकडे होते. हे वारे ईशान्य दिशेकडे येईल.  त्यानंतर वायव्य कडे वळण्याची शक्यता आहे. 

हे चक्रीवादळ किनाऱ्याला समांतर दिशेने जाईल त्यामुळे वाऱ्याची तीव्रता 145 ते 170 किलोमीटर इतकी राहील . यामुळे अरबी समुद्र मध्ये उंच लाटा उसळण्याची शक्यता असणार आहे.  महाराष्ट्राच्या किनारपट्टी लगत आजपासून ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. 

त्यामुळे हलक्या व मध्यम पावसाची शक्यता किनारपट्टीवर आहे समुद्राच्या लाटा उंच उसळल्यामुळे समुद्रामध्ये मासेमारींना न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. म्यानमार किनाऱ्यावर तसेच बंगालच्या उपसागरामध्ये  कमी दाब क्षेत्राची   निर्मिती झाली आहे. 

ईशान्य भारत उद्या व्यापण्याचे संकेत. 

नऊ तारखेला मॉन्सून ने प्रगती केलेली नाही.  परंतु आज दहा तारखेला मान्सून प्रगती करणार असल्याची शक्यता आहे.  तसेच उद्या अकरा तारखेला पश्चिम बंगालचा हिमालयाकडील भाग,  सिक्कीम राज्यात,  तसेच संपूर्ण ईशान् भारत यामध्ये मान्सून प्रगती करणार आहे. 

पूर्व मौसमी पावसाची शक्यता.

विदर्भामध्ये तापमान वाढ झालेली आहे. तसेच काही राज्यात उन्हाच्या झळा सहन होत नाही . दिनांक दहा आज पासून पूर्व मौसमी पाऊसला पोषक हवामाना असल्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा ,येथे विजा तसेच मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. 

विभागानुसार पावसाचा अंदाज

कोकण :- सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,

मध्य महाराष्ट्र :-  नाशिक, पुणे ,सांगली कोल्हापूर ,सातारा जळगाव, नगर सोलापूर

मराठवाडा :- जालना, बीड ,लातूर ,परभणी, धाराशिव ,छत्रपती संभाजी नगर,

विदर्भ :- वाशिम, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा. 

Leave a Reply