भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकऱ्यांना आवश्यक खते कीटकनाशके गावांमध्येच उपलब्ध होत नसून, ते दूरवरून खाजगी दुकानांमधून खरेदी करावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये मध्ये वाढ होते.
यामुळे गावांमधील विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या माध्यमातून खत विक्रीचा निर्णय सरकारने घेतलेला आहे . सरकारी बैठकीमध्ये या सेवा सोसायटी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना खते कीटकनाशके बियाणे तसेच यंत्रसामग्री स्थानिक पातळीवरच उपलब्ध होऊ शकेल.
सरकारचे ‘सहकार से समृद्धी’ चे स्वप्न या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. यामध्ये विविध कार्यकारी सोसायटी यांना बियाणे ,खते, कीटकनाशक, विक्री करणे तसेच दूध व्यवसाय ,मत्स्यपालन , व्यवसाय कुक्कुटपालन, फुल शेती, यासह 25 मोठ्या विभागानुसार व्यवसाय सरकार सुरू करून देणार आहे. यामुळे त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल.
त्याचबरोबर कीटकनाशके व खते व फवारणीसाठी ड्रोन देखील भाड्याने देऊ शकतील . यामुळे ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतील. विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांना मॅपिंगच्या आधारे पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रच्या कक्षेत आणले जाणार आहे.