आज शनिवारी दुपारी दोन वाजता तुकाराम महाराजांची पालखी देहूकडे प्रस्थान करणार आहे. वारकऱ्यांना विठुरायाला भेटण्यासाठी ची आतुरता लागली आहे. वारकरी कानाकोपऱ्यातून दिंडीमध्ये येतात. गुरुवारी आठ तारखेला देहू मधील मुख्य देऊळ वाड्यात वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती . भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून देहू मधील नगरपंचायत प्रशासनाने सर्व तयारी केली आहे.
सरकारने निर्मळ वारीचे आयोजन केलेले आहे ,यामुळे देहूमध्ये हजार शौचालये उभारली आहे . तसेच पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे प्राथमिक आरोग्य केंद्रचे वतीने विविध ठिकाणी बाह्य रुग्णविभाग सुरू करण्यात आलेली आहे. मानकरी, सेवकरी हे देखील पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी दाखल झालेले आहेत. सोहळ्यातील प्रमुख आकर्षक म्हणजे पालखीचा चांदीचा रथ यालाही पॉलिश करण्यात आलेली आहे. त्याला जुंपण्यात येणारी बैल जोडी देखील गावात दाखल झालेली आहे. सोहळ्याचे प्रमुख असलेले संजय मोरे यांनी ही माहिती दिली आहे . यावेळी अजित महाराज मोरे भानुदास महाराज मोरे उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्याचे दहा टँकरची सुविधा उपलब्ध केलेले आहे. 24 तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तुकाराम महाराज अन्नदान मंडळ यांच्याकडून भाविकांसाठी अन्नदानाची सोय करण्यात आलेली आहे. व वाहनांसाठी सरकारी गायरानात वाहनतळ उभारले आहे.
असं असेल पालखी प्रस्थान सोहळा.
पहाटे पाच वाजता :- संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखीसोहळ्याचे प्रमुख विश्वस्तांच्या महापूजा
पहाटे पाच वाजता:- पालखी सोहळ्याचे जनक तर तपोनिधी नारायण महाराज यांच्या हस्ते समाधी मंदिरात पूजा.
सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत:- देऊळवाड्यातील भजनी मंडळामध्ये देहूकर महाराज यांचे पालखी सोहळा सप्ताह काल्याचे कीर्तन