शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण , 34 केंद्रांपैकी 28 केंद्रावरून धान्य खरेदी सुरु,

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण , 34 केंद्रांपैकी 28 केंद्रावरून धान्य खरेदी सुरु,

धान्याचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो.  शासनाने आदिवासी विकास मंडळातर्फे धान्य खरेदी करणाऱ्या संस्थांचे धान्य खरेदीचे कमिशन कमी केलेले आहे.  मागे  धान्याच्या तुटीचे प्रमाण कमी केले होते त्यामुळे धान्य खरेदी करणाऱ्या संस्था संकटात आल्या होत्या. 

या संस्थानी रब्बी हंगामातील धान्य खरेदीवर बहिष्कार घातला होता.  मागील पंधरा दिवसापासून गोंदिया जिल्ह्यात धान्य खरेदी पूर्णपणे ठप्प होती . शेतकऱ्यांचा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांवर धान्य खरेदी करा असा दबाव होता. 

34 केंद्रापैकी 28 केंद्रावर धान्य खरेदी सुरू

जिल्ह्यातील सर्व संस्थांनी शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून होणारी लूट थांबवण्यासाठी रब्बी धान्य सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.  रब्बी धान्य खरेदी आता सुरू आहे.  गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी ,मोरगाव अर्जुनी ,देवरी ,सालेकसा,  या तालुक्यांमध्ये धान्य खरेदी सुरू आहे . एकुण धान्य खरेदीचे केंद्र 34 आहे.  या 34 धान्य खरेदी केंद्रापैकी 28 केंद्रावर धान्य खरेदी सुरू आहे , यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची वातावरण निर्माण झालेले आहे. 

ज्या ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनी लवकरात लवकर धान्य खरेदीवर आपले धान्य आणावेत असे आव्हान अधिकाऱ्यांनी केलेले आहे . या चार तालुक्यांमध्ये धान्य खरेदी सुरू झाल्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होणार नाही

Leave a Reply