15 ऑगस्टनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज..

सध्या राज्यामध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे . राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला आहे. नदी, नाले धरणांचा पाणीसाठा वाढला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 29 टक्के पाऊस जास्त झाला आहे. तर राज्यात 15 ऑगस्टनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

महिनाअखेरपर्यंत पावसाचा जोर वाढणार..

हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या जरी राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी 15 ऑगस्टपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो . हळूहळू पावसात 22 ऑगस्टपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ महिना अखेरपर्यंत चालू राहील अशी माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 29 टक्के पाऊस जास्त झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे . तर जादा पावसामुळे काही ठिकाणी शेतकरी संकटात देखील आले आहेत.

धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ..

पुणे विभागातील अनेक धरणे आता भरत आली असून उजनी ,भाटघर, वीर धरण 100% ने भरले आहे. निरा देवघर धरणात 97.20%, पानशेत 99.13%, डिंभे 83.79 ,चाकसमान 99.02%, पवना 95.27%, खडकवासला 81.43%, टक्क्यांनी भरले आहे.या सर्व धरणांमधून सध्या विसर्ग सुरू असून मुळा,मुठा, भीमा, मीरा नदीपात्रात पाण्याची आवक होत आहे. कोल्हापूर ,सातारा, सांगली, मधील धरणांची ही स्थिती सध्या चांगली आहे तेथील बहुतांश धरणे 80 टक्क्यांच्या पुढे गेली आहेत. कोल्हापूरचा दूधगंगा प्रकल्प 85.95 टक्क्यांनी तर राधानगरी 97.82 टक्के भरला आहे.

शनिवारी मराठवाड्यातील धाराशिव. नांदेड, लातूर. तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे . तर रविवारी सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील लातूर, धाराशीव, हिंगोली, नांदेड, जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.मराठवाड्यातील लातूर. धाराशिव, नांदेड, तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

Leave a Reply