मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात बुधवारपासून पाऊस वाढणार ? पहा हवामान अंदाज ..

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात बुधवारपासून पाऊस वाढणार पहा हवामान अंदाज ..

राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये पाऊस सध्या रजेवर गेला पण येत्या तीन दिवसांत चांगला पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त होत आहे.सोमवार आणि मंगळवारी कोकण घाट माथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.

तर पश्चिम महाराष्ट्र,  उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्‍या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज .मान्सून सुरू होऊन नव्वद दिवस उलटत आले .

तरी मुंबई आणि कोकण वगळता अजूनही राज्यातल्या बहुतांश भागात पावसाने सरासरी सुद्धा गाठली नाही.  त्यामुळे पिके संकटात आली आहेत . तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई सुद्धा उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.  त्यामुळे राज्य सरकारने बहुतांश धरणातील साठे हे पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील काही भागांमध्ये मागील मागील दोन दिवसापासून मध्यम ते हलक्या सरी पडत आहेत शेतकऱ्यांना अद्यापही जोरदार पावसाच्या अपेक्षा आहे.  आज आणि उद्या राज्यात जोरदार पावसाची अपेक्षा नाही परंतु बुधवारपासून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.

पावसाने जवळजवळ एक महिन्याचा खंड दिला असल्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत . आज पुणे ,नांदेड, सातारा, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर जळगाव व धुळे या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये विजांसह हलक्या सरी पडतील. 

बुधवारपासून राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे.  बुधवारी मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर ,सोलापूर ,सांगली, सातारा तर कोकणातील रत्नागिरी, रायगड, जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. 

तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.  तर राज्याच्या इतर भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Leave a Reply