सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे ठरावीक जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडत आहे. बहुतांश ठिकाणी पुढील सात दिवसांमध्ये हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आहे.
मान्सूनसाठी अनुकूल स्थिती येत्या पंधरवड्यात नसल्याने सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडेल, तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मात्र राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.
सध्या देशातील ईशान्येकडील राज्यांमध्ये बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या प्रणालीमुळे पाऊस सुरू आहे.परंतु राज्यामध्ये केवळ हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्यामुळे याचा थेट परिणाम पिकांवर व धरणातील पाण्याच्या साठ्यावर होत आहे
राज्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची येत्या सात दिवसांमध्ये शक्यता आहे कोकणामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे
हा पाऊस सरासरीच्या किती तरी कमी असेल त्यानंतरच्या आठवड्यात देखील हीच स्थिती कायम राहील. मात्र, त्यात थोडी सुधारणा होऊ शकते. बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात मान्सूनला सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर अनुकूल प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सबंध राज्यभर सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडेल.’ परंतु सध्या राज्यात पावसाविना पिके सुकून चालली आहेत.२५ ऑगस्टपर्यंत राज्यात सरासरी ७६९.१ मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात आतापर्यंत ६६२.३ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस ८६.१ टक्के सरासरीच्या इतका आहे.
चांगल्या पावसाची पुढील दोन आठवडे शक्यता नाही. शेतकऱ्यांनी पिकांच्या संवेदनशील अवस्थेनुसार नियोजन करावे. कापूस पिकाला एक पाणी द्यावे, तर सोयाबीन पिकात एक सरी आड आंतरमशागत करून जमीन भुसभुशीत करावी. त्यामुळे जमिनीतील आर्द्रता टिकून राहील.
– प्रमुख, हवामान अंदाज, भारतीय हवामानशास्त्र विभाग,डॉ. अनुपम काश्यपी,
एक जूनपासून २३ ऑगस्टपर्यंतचा पाऊस
पालघर २४, ठाणे २६, रायगड १४, सिंधुदुर्ग ३, मुंबई ३१, कोल्हापूर १४, सांगली ४४, सातारा ३७, पुणे १६, सोलापूर २५, नगर ३३, नाशिक ७, धुळे २०, धाराशिव १९, परभणी २१, हिंगोली ३२, लातूर ४, नांदेड २७, बुलढाणा १९, नंदुरबार २९, जळगाव ११, संभाजीनगर ३१, जालना ४६, बीड ३२, अकोला २७, वाशिम १५, अमरावती ३१, यवतमाळ १०, वर्धा ८ नागपूर ५, चंद्रपूर ४, भंडारा २, गोंदिया १५, गडचिरोली १. (सरासरीपेक्षा टक्क्यांत