राजे यशवंतराव होळकर महामेष योजना..
राज्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती साठी असणारी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना, काय आहे हि यौजना वाचा सविस्तर.
1.कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई सुविधेसह २० मेंढया १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थायी)
2.स्थलांतर पद्धतीने मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई सुविधेसह २० मेंढया १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थलांतरीत)
3.ज्यांच्याकडे स्वतचे २० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा १ नरमेंढा ७५% अनुदानावर वाटप करणे.
4.ज्यांच्याकडे स्वतचे ६० पेक्षा कमी व ४० पेक्षा अधिक मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा २ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
5.ज्यांच्याकडे स्वतचे ६० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ८० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ३ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
6. Karj Mukti Yojana : नियमित कर्ज फेडणाऱ्या मृत शेतकऱ्यांच्या वारसानांही लाभज्यांच्याकडे स्वतचे ८० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु १०० पेक्षा कमी मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ४ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
7.ज्यांच्याकडे स्वतचे १०० किंवा त्यापेक्षा अधिक मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ५ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
8.ज्यांच्याकडे स्वत: च्या २० मेंढया व १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० मेंढ्यापेक्षा कमी अशा मेंढ्याच्या एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मंढी पालनासाठी पायाभूत सोई – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी)
9.ज्यांच्याकडे ४० मेंढ्यापेक्षा कमी परंतु ज्यांच्याकडे स्वतः च्या २० मेंढ्या व १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढया आहेत आशा लाभर्त्याला मेंढ्यांच्या स्थलांतरीत स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत).
10.ज्यांच्याकडे एकूण ४२ मेंढया, म्हणजे स्वतः च्या ४० मेंढ्या व २ मेंढानर किंवा त्यापेक्षा अधिक मेंढया आश्या लाभार्थ्यांना एका ठिकाणी राहून स्थापी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी)
11. ज्यांच्याकडे स्वतः च्या ४० मेंढ्या व २ मेंढानर अशा एकूण ४२ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक अशा मेंढ्यांच्या स्थलांतरीत स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत)
12.एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी) (१०० ग्रॅम प्रती दिन प्रती मेंढी याप्रमाणे माहे एप्रिल ते जुलै या ४ महिन्याच्या कालावधी करिता)
13.भटकंती करणारे स्थलांतरीत स्वरूपाच्या मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत) (१०० ग्रॅम प्रती दिन प्रती मेंढी पाप्रमाणे जून ते जुलै या २ महिन्याच्या कालावधी करिता)
14.कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मुरघस करण्याकरिता घासड्या बांधण्याचे पंत्र (Mini Sailage Baler cum Wrapper) खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान वाटप.
15.पशुखाद्या कारखाने उभारणीसाठी ५०% अनुदान वाटप
◼️ कोणासाठी आहे हि यौजना :
राज्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती साठी हि योजना आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ सप्टेंबर २०२४ रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहे.
◼️ येथे करा आर्ज :
◼️ अधिक माहितीसाठी:
◼️ आश्याच नवंनवीन शासनाच्या योजण्यांच्या माहितीसाठी आमच्या कृषी २४ तास च्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉइन व्हा.
https://chat.whatsapp.com/Jzhati8wVxMAQrcI1BVDtC