सध्या बाजारात मिळणारे कांद्याचे बाजारभाव तुलनेने समाधानकारक असले, तरी या आठवड्यात कांद्याच्या किंमती घसरल्या आहेत, तर टोमॅटोच्या किंमती मात्र वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
कांद्यात (onion prices) अशी झाली घट..
कांद्याची बाजारातील लासलगाव मागील सप्ताहातील सरासरी किंमती रु. ४३९२ प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत ८ टक्केनी घट झाली आहे.
बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाने प्रसिद्ध केलेल्या दि. १ डिसेंबर रोजी संपलेल्या साप्ताहिक अहवालात या नोंदी केल्या आहेत.
देशपातळीवर व राज्यात कांद्याच्या आवकमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत १४ % नी घट झाली आहे.
मागील आठवड्यात पिंपळगाव बाजारात कांद्याच्या किंमती (रु. ४९३१/क़्वि.) सर्वाधिक होत्या, तर सोलापूर बाजारात किंमती कांद्याच्या रु.२७५०/क्वि. इतक्या होत्या.
टोमॅटोचा (tomato prices) बाजारभाव वधारला:
टोमॅटोच्या बाजारातील सप्ताहातील पुणे मागील सरासरी किंमती रु. २००० प्रती क्विंटल होत्या. किंमतीत मागील आठवद्याच्या तुलनेत १७% नी वाढ झाली आहे.
देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या आवक मध्ये १०.३ टक्केनी घट झाली आहे. – प्रमुख APMC बाजारापैकी मुंबई बाजारात सर्वाधिक किंमती (रु.२४२५/क्विं.) होत्या तर सोलापूर बाजारात सर्वात कमी किंमती (रु. १५००/ क़्वि.) होत्या.