दुधाबाबत दूध उत्पादक संस्था आणि शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी राज्य सरकारकडून समिती नेमण्यात येईल अशी माहिती दूध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. समितीच्या शिफारसी नंतर स्वतंत्र बैठक घेऊन दुधाचे कमाल दर अंतिम करण्यात येईल असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले दूध दर प्रकल्प संदर्भात राज्यातील प्रमुख खाजगी व पशुखाद्य उत्पादक आणि सहकारी दूध उत्पादक संघ कंपन्यांसह विखे पाटील यांची बैठक पुण्यात झाली.
या बैठकीमध्ये माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार राहुल कुल, संग्राम थोपटे ,तसेच दूध संस्थांचे प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर वाढून मिळाला पाहिजे .खाजगी व सहकारी दूध संघांनी शेतकऱ्यांना प्रति लिटर किमान 35 रुपये इतका दर दिला पाहिजे
पशुखाद्य दरात 25 टक्के दर कमी करण्याचे निर्देश
पशुखाद्य दरामध्ये 25 टक्के दर कमी करण्याच्या संबंधित कंपनीला मी निर्देश दिलेले आहेत त्यामुळे पशुखाद्य हे कमी दरात मिळेल व यामुळे दूध उत्पादकांचा उत्पादन खर्च कमी होईल यामुळे शेतकऱ्यांना दिलाचा मिळाला आहे
एक ते तीन रुपयांमध्ये पशुधनाचा विमा उतरवण्याचा सरकारचा विचार आहे
लंबी रोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांना लसीचा दुसरा डोसही मोफत देण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले