रब्बीहंगामातील अनुदानित बियानांसाठी येथे करा नोंदणी…

यावर्षी मुबलक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे लवकरच शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीचे नियोजन करता येणार आहे. शेतकऱ्यांना हे नियोजन करताना आर्थिक हातभार मिळणार आहे. त्यासाठी अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे .

यासाठी ऑनलाइन स्वरूपामध्ये बियाण्याची नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना हे बियाणे मिळणार आहे . रब्बीच्या पेरणीचे नियोजन जिल्ह्यात २ लाख आठ हजार हेक्टरवर करण्यात आले आहे. त्यादृष्टीने पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सुरुवात करता यावी म्हणून शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहेत .

या कामात ‘महाबीज’ने पुढाकार घेतला आहे. पेरणीकरिता यवतमाळ जिल्ह्याला ५ हजार ८३० क्विंटल हरभऱ्याच्या बियाण्याची उपलब्धता करून दिली जाणार आहे. गव्हाचे बियाणेदेखील शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध होणार आहे. यासोबतच ५९० क्विंटल हरभऱ्याचे बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. दोन्ही बियाणे मिळविताना प्रथम त्याची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.

एका शेतकऱ्याला एक बॅग

अनुदान स्वरूपातील बियाण्याचे वितरण करताना एका शेतकऱ्याला एक बॅग दिली जाणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/ पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. यानंतरच या बियाण्याची बॅग शेतकऱ्यांना मिळणार आहे. ऑनलाइन वाटपानंतर उर्वरित बॅगा ऑफलाइन स्वरूपातील नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.

या अर्जासाठी भरावा लागणारा शुल्क
बियाणे अनुदान योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाचे ऑनलाईन शुल्क 26.60 रुपये ऑनलाईन स्वरूपात भरावे लागतील .

या पद्धतीने होईल अर्ज मंजूर..

तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जमा केलेला अर्ज कृषी अधिकारी यांच्याकडून मूल्यमापन करून त्यानुसार तुम्ही पात्र असाल तर तुमचा अर्ज मंजूर केला जाईल अनुदान जितक्या शेतकऱ्यांना द्यायचे आहे त्या प्रमाणात जर खूप जास्त अर्ज प्राप्त झाले असतील तर लॉटरी पद्धतीने निवड केले जाते ,एकदा तुमचा अर्ज मंजूर झाला की काही दिवसातमध्ये कृषी विभागातील कृषी सहाय्यक अधिकारी तुम्हाला कॉल करून लाभ घेण्याची माहिती देतील. तुम्हाला रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदान योजना अंतर्गत बियाण्यांचे वाटप तुमच्या जवळच्या शासकीय कृषी कार्यालयात करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *