अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर , कोणत्या जिल्ह्याला किती मदत जाणून घ्या सविस्तर ..

जून २०२४ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीमध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे.

मदत, पूनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या माहितीनुसार या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याने याचा लाभ संबधित शेतकऱ्यांना होईल.

शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे सततचा पाऊस , अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ इ . कारणामुळे जर नुकसान झाले तर निविष्ठा अनुदान स्वरूपामध्ये मदत करते . राज्य सरकारला विभागीय आयुक्तांकडून अधिकच्या निधीचा प्रस्ताव नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण केल्यानंतर पाठवण्यात आले होते.या प्रस्तावानुसार मदत निधीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

केंद्र शासनाकडून विहित केलेल्या नैसर्गिक आपत्तीं व्यतिरिक्त राज्य शासनाकडून अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण,अवेळी पाऊस, व आकस्मिक आग या आपत्तींमध्ये नुकसान होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे सततचा पाऊस ही देखील नैसर्गिक आपत्ती आहे हे घोषित केले आहे.

जून ते ऑगस्ट महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण मदत निधी जमा करण्याचे निर्देश शासन निर्णयामध्ये दिले आहेत .जास्तीत जास्त ३ हेक्टर मर्यादेत बागायत ,जिरायत, व बहुवार्षिक पिकांसाठी सुधारीत दराने नुकसान मदत देणार असल्याचा उल्लेख राज्य सरकारच्या शासन निर्णयामध्ये करण्यात आला आहे.

२३७ कोटी रुपयांच्या मदत निधीला राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंजुरी दिली आहे. जून ते ऑगस्ट २०२४ दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यातमध्ये अतिवृष्टी झाली होती. राज्य सरकारने १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय सोमवारी (ता.२३) प्रसिद्ध केला आहे.

जिल्हानिहाय निधी वितरण..

🔰 गडचिरोली जिल्ह्यासाठी ५७७२.४२ लक्ष.

🔰वर्धा जिल्ह्यासाठी ३६९१.७६ लक्ष

🔰 चंद्रपूर जिल्ह्यासाठी ७४२९.२२ लक्ष

🔰 अकोला जिल्ह्यासाठी १२९०.१७ लक्ष

🔰 यवतमाळ जिल्ह्यासाठी ५४७.९६ लक्ष

🔰 बुलढाणा जिल्ह्यासाठी १३५८.६६ लक्ष

🔰 वाशिम जिल्ह्यासाठी ७२.५५ लक्ष

🔰नागपूर जिल्ह्यासाठी १८३६.५६ लक्ष

🔰 पुणे जिल्ह्यासाठी ४५८.७१ लक्ष

🔰 सातारा जिल्ह्यासाठी ८४.८६ लक्ष

🔰सांगली जिल्ह्यासाठी १११३.२५ लक्ष

🔰 अमरावती जिल्ह्यासाठी ५१.०१ लक्ष

अशा एकूण २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Leave a Reply