जमिनीची खरेदी-विक्री करताना या गोष्टी जरूर तपासा, त्यामुळे भविष्यात येणार नाहीत अडचणी वाचा सविस्तर …

jamin kharedi vicri

मिनीची खरेदी विक्री करणे, तसे कठीणच काम. मात्र ज्यांना ही गोष्ट सवयीची असते त्यांच्यासाठी ते सहज सोपं असतं. अशात जमिनी संबंधित 5 गोष्टी प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे आवश्यक आहे.

या 5 गोष्टी जर जमिनी खरेदी विक्री करताना तपासल्या नाही, तर भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

जमिनीचा चतुर्सिमा – जमिनीची चतुर सीमा म्हणजे हद्द आहे. शेजाऱ्याने बांध करण्याचे आणि बांध सरकवण्याचे प्रकार आपण ऐकले असतील. जमिनीची हद्द सारखं क्षेत्र पूर्ण भरते की नाही याच्या बाबतीमध्ये तुम्ही माहिती घेतली पाहिजे आणि त्याची माहिती घेणे काहीही चुकीचं नाही, यासाठी तुम्ही जमीन व्यवस्थित मोजून चतुर्सिमा प्रमाण आहे की नाही, ते तपासणे आवश्यक आहे.

जमिनीवरील बोजा व न्यायप्रविष्ठ खटला – जमिनीवर कुठल्या बँकेचे कर्ज आहे की नाही, हे तपासणे फार महत्त्वाचे आहे. कारण जमीन कुठे गहाण वगैरे ठेवून जर त्यावर पैसा वगैरे उचललेला असेल आणि तुम्हाला डुब्लिकेट सातबारा दाखवून जमिनीची खरेदी विक्री होत असेल, तर फसवणूक होऊ शकते. यासाठी डिजिटल सातबारा काढून क्रॉस चेक करता येऊ शकते.

सातबारावर असणारी नावे – सातबारा वर असणारी व्यक्तींची एकूण नावे तपासणे देखील आवश्यक आहे. जो व्यक्ती जमीन विकत आहे त्याच्याच नावावर सातबारा आहे का किंवा इतर काही वारसदार त्याला लावले आहेत का? तसेच काही कुळ त्यावर लावलेले आहे का, ती व्यक्ती हयात आहेत का आणि हयात असताना त्यांच्यासाठी काही हरकत तर नाही ना, यासंदर्भातील गोष्टींचा विचार तुम्ही करणे आवश्यक आहे.

जमीन आरक्षित तर नाही ना? – काही जमिनींना हिरवा पट्टा किंवा पिवळा पट्टा इत्यादी गोष्टी आरक्षित करते. जर जमीन या आरक्षित प्रकारातील आहे. तर याची चौकशी करणे फार गरजेचे आहे. कारण की ही जमीन गव्हर्मेंट च्या ताब्यातही असू शकते म्हणजेच शासन काही जमिनींना पिवळा पट्टा किंवा पिवळा पट्टा लावलेला असतो.

जमिनीत येण्या-जाण्यासाठी रस्ता – ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. याबाबच नेहमीच वाद होतात. त्यामुळे प्लॉट किंवा जमीन खरेदी करताना त्यामध्ये किती फुटाचा रस्ता आहे, शासन नियमानुसार त्याचा नकाशा बघून तो रस्ता दाखवलेला असताना तो रस्ता योग्य प्रमाणे आहे का? शेतीमध्ये बैलगाडी जाते का, रस्ता पुढे भविष्यात बंद होईल की नाही या संदर्भातील सर्व माहिती घेणे गरजेचे असते.

source :- dainikmaval

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *