काही दिवसापासून टोमॅटोला सोन्याचे भाव आले आहेत. टोमॅटोने दोनशे रुपये प्रति किलोचा आकडा गाठला आहे. त्यामुळे टोमॅटोची सर्वत्र चर्चा सुरू आहे. टोमॅटोची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून जुन्नर तालुक्यातील नारायणगाव बाजार समितीला ओळखले जाते.
या समितीच्या आवारात एक आगळंवेगळं टोमॅटो पाहिला मिळाले आहे. मंगळवारी विक्रीसाठी आलेल्या टोमॅटोमध्ये गणपती बाप्पाने दर्शन दिले आहे. एका मजुराला गणपती बाप्पासारखा दिसणारा खास टोमॅटो सापडला.
उत्तर भारतातून नारायणगाव परिसरात अनेक व्यापारी व हजार पेक्षा जास्त मजूर टोमॅटो कॅरेट भरण्यासाठी दाखल झाले आहेत . यातच उत्तर प्रदेशमधील बवई तालुका ग्यानपूर, जिल्हा भांनडोही येथील मजूर शिवराज बिंद हे मंगळवारी टॉमेटो निवड आणि पॅकिंग करत असताना त्यांना बाप्पाच्या आकाराचं हे अनोखं टोमॅटो दृष्टीस पडलं.
बाप्पाच्या आकाराचं टोमॅटो पाहून युवराज यांनाही विशेष वाटलं .टोमॅटो सोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केला आणि बघता बघता हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. एकीकडे टोमॅटोने ग्राहकांची चिंता वाढवली. परंतु दुसरीकडे मात्र सगळ्यांचं मन जिंकल आहे.