राज्यात विदर्भासह विविध भागामध्ये हलक्या ते जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, जोरदार वारे व विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.
मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचा पश्चिम भाग दक्षिणेकडे कायम असून राजस्थानच्या बिकानेर ,सिद्धी, गया बालुरघाट , अरुणाचल प्रदेशापर्यंत सक्रिय आहे. कोकण घाट माथ्यावर पाऊस ओसरला असून, विदर्भात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज कोकण मधील सिंधुदुर्ग ,पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भात, विजांसह पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
जोरदार पावसाचा इशारा
सिंधुदुर्ग ,चंद्रपूर, गडचिरोली ,भंडारा, गोंदिया,
विजांचा पावसाचा इशारा
जळगाव, धुळे ,नाशिक, छत्रपती, संभाजीनगर ,जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, वर्धा, यवतमाळ.