जीएसटी परिषदेची बैठक दिल्ली येथे पार पडली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीमध्ये अनेक वस्तू ,सेवा ,वरील जीएसटी कमी करण्याचा किंवा त्यांना जीएसटी मधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला .
तसेच ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर जीएसटी लावण्याचा किंवा वाढवण्याचा निर्णय परिषदेने घेतला. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या वस्तू किंवा सेवांच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर कोण कोणत्या वस्तू स्वस्त होणार व कोणकोणत्या वस्तू महाग होणार हे पाहूया.
काय स्वस्त होणार
जीएसटी कौन्सिल कर्करोग शी लढणारी औषधे दुर्मिळ आजारावरील औषधांना जीएसटी करातून सूट दिली आहे.
तसेच जीएसटी मधून खाजगी कंपनीच्या उपग्रह प्रक्षेपणाच्या सुविधेलाही सूट देण्यात आली आहे.
मत्स्य तेल काढताना मिळणारे द्रव्य (Fish Solubale paste) आणि एलडी स्लॅग(LD Slag)वरील जीएसटी दर १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.
वाळवलेले चिप्स आणि तत्सम पदार्थावरील जीएसटी 18% होऊन 5% करण्यात आलेला आहे
सिनेमागृहामध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरही जीएसटी 18 टक्क्याहून पाच टक्के करण्यात आलेला आहे.
जरी धाग्यावरील जीएसटी हा देखील बारा टक्क्याहून पाच टक्के करण्यात आलेला आहे.
काय महाग होणार
जीएसटी कौन्सिलने मल्टी युटिलिटी व्हेईकल्स वर 22 टक्के सेस लादण्यास मान्यता दिली आहे.
हॉर्स रेसिंग आणि ऑनलाइन गेमिंग, कॅसिनोमध्ये गुंतवलेल्या संपूर्ण रकमेवर २८ टक्के कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.