खरीप हंगामासाठी महाबीजची बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना राबवण्याचे जाहीर, काय आहे ही योजना जाणून घ्या सविस्तर ..

महाबीजने येत्या खरीप हंगामासाठी बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना राबवण्याचे जाहीर केले आहे . या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून . १० ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना राबविण्यात येत आहे.

महामंडळाकडून प्रत्येक बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजनेस १९९२-९३ च्या खरीप हंगामापासून वाढता प्रतिसाद आहे. या योजनेमुळे बीजोत्पादन व बीजोत्पादक गावांची निवड करण्यास मदत होत असते तसेच वेळेवर पायाभूत बियाणे आरक्षित बीजोत्पादन कार्यक्रमासाठी पुरवठा करणे सुद्धा फायदेशीर झाले आहे. त्याच उद्देशाने या खरीप हंगामामध्ये महामंडळाने प्रमाणित तथा पायाभूत बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना राबवली जाणार आहे .हा कार्यक्रम कमीत कमी गावांमध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावर तथा बीज प्रक्रिया केंद्रानजीकच्या गांवामध्ये आयोजित करण्याचे नियोजन आहे. ‘गाव’ हा प्रमुख घटक बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजनेमध्ये गृहीत धरलेला आहे तसेच या योजनेचा उद्देश १०० टक्के क्षेत्र तपासणी करून, बीजोत्पादकांना गाव संख्या कमी असल्यामुळे वेळोवेळी आवश्यक ते संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन केले जाऊन उत्पादित बियाण्यांची उच्चतम गुणवत्ता राखणे सोपे होईल, हा ठेवण्यात आला आहे .

शेतकऱ्यांना बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजनेमध्ये शंभर रुपये प्रति एकराप्रमाणे आरक्षण रक्कम भरून सहभागी होता येईल. ‘गाव’ हा प्रमुख घटक ‘बीज ग्राम योजने’अंतर्गत महाबीज बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये गृहीत असून जास्तीत जास्त बीजोत्पादन कार्यक्रमाचे आयोजन एकाच गावात करण्याचे नियोजन आहे.

बीज प्रक्रिया केंद्राच्या ५० किलोमीटरच्या परिसरातील गावामध्ये खरीप २०२४-२५ बीजोत्पादन कार्यकम प्राधान्यक्रमाने राबवला जाईल.
या योजने अंतर्गत एका गावामध्ये पीक, वाण, दर्जा मिळून भाजीपाला पिकांसह कमीत कमी ५० एकर बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. योग्य कच्चे बियाणे, प्रक्रिया, लॉट साइजकरिता तूर, ज्यूट, तीळ, वगळून इतर पिकांचा 3 एकरांपेक्षा कमी क्षेत्रावरील कार्यक्रम टाळणे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

जास्तीत जास्त बीज गुणांक (एसएमआर) मिळवण्याच्या दृष्टीने एकाच तालुक्यामध्ये संपूर्ण पायाभूत बीजोत्पादन कार्यक्रम सुरुवातीलाच योग्य क्षेत्राची व योग्य बीजोत्पादक निवड करून राबविण्याचे नियोजन केले आहे . तृणधान्य कडधान्याचे उत्पादन वाढ तथा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत नवीन वाणांचा या मध्ये समावेश करून त्यांच्या बियाण्याची उपलब्धता वाढवणे.महाबीजच्या संपर्क कार्यालयाशी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी
संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply