मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केटमध्ये पन्नाशी पार केलेला कांदा चाळिशीच्या घरात आला आहे.तरी यंदा राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता कांद्याची लागवड कमी होण्याची शक्यता असल्याने वेळप्रसंगी आयात करण्याची भीती एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
राज्यात सध्या नवीन कांद्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारात सध्या साठवणुकीतील जुना कांदा मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहे. आठवडाभरापासून मार्केटमध्ये जुने आणि नवीन अशा दोन्ही कांद्याला चांगला भाव मिळाल्याने .
घाऊक बाजारात कांद्याने पन्नाशी पार केली होती.तर किरकोळ बाजार मध्ये 70 रुपये प्रति किलो दराने विकला जात होता . मात्र वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होणार जुना कांदा सुमार दर्जाचा असल्याने या कांद्याला अधिक उठाव नसल्याने दरात घसरण झाली आहे.
राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने कांद्यासह नवीन शेतमालाच्या लागवडीला पाण्याअभावी अडचणी येणार आहेत. परिणामी, उत्पादन घटणार असल्याने एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात कांद्याची टंचाई निर्माण होऊन परदेशातून कांदा आयात करण्याची वेळ येऊ शकते.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता..
राज्यात सुरू असलेल्या मॉन्सूनोत्तर पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज (ता. २९) मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. तर हवामान विभागाने उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तविली आहे.
आज मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर ,बीड, विदर्भातील अमरावती ,नागपूर, वर्धा, भंडारा ,चंद्रपूर, गडचिरोली, जिल्ह्यांत विजांसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ कायम आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान, विजांसह पावसाची शक्यता आहे.
जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.