सोयाबीनपासून तयार केलेले दूध आणि टोफूला शहरी बाजारपेठेत चांगली मागणी, वाचा सविस्तर ..

आवश्यक जीवनसत्त्वे आणि कॅल्शिअम पनीरमध्ये असते. सोयाबीनच्या दुधापासून टोफू बनवले जाते. साडेसात लिटर पर्यायी दूध किंवा पावणेदोन किलो पनीर (टोफू)हे एक किलो सोयाबीनपासून तयार होते.

सोयाबीनपासून तयार केलेले दूध आणि टोफूला शहरी बाजारपेठेत ग्राहकांची चांगली मागणी वाढत आहेत . सोयाबीनपासून जे प्रथिने मिळतात त्यांचे प्रमाण शेंगदाणा,डाळ, मांस, मासे यांच्या तुलनेत दुप्पट आहे तसेच अंड्याच्या तुलनेत तिप्पट तर दुधाच्या तुलनेत दहा पट जास्त सोयाबीन मध्ये प्रथिने असतात . त्यामुळे सोयाबीनपासून विविध प्रक्रियायुक्त निर्मिती व विक्री मोठ्या प्रमाणावर होते. सोयाबीनमध्ये कर्बोदके कमी प्रमाणात असल्यामुळे मधुमेही व्यक्तींना हे एक चांगले धान्य आहे म्हणून उपयोग होतो .

सोयाबीनचा वापर करताना

प्रक्रिया न करता सोयाबीन आहारात वापरतात. सोयाबीनमध्ये भरपूर पौष्टिक घटकांसोबतच अपौष्टिक घटकदेखील आहेत. त्यामुळे पचन संस्थेत बिघाड होऊन आरोग्यास हानी पोहचू शकते.

कारण सोयाबीनमध्ये स्टॅचिओज, गॅलॅक्टोज, फायटीक आम्ल ओलीगोसॅकराइड्‍स इ. अपौष्टिक घटक आहेत , या घटकांमुळे पचन सुलभरीत्या होत नाही शरीरामध्ये वायुविकार असे आजार प्रबळ होतात.

आहारात सोयाबीन प्रक्रियेविना वापरले तर काही काळानंतर पचनक्रिया, यकृत, मूत्रपिंड,रक्तशर्करा इत्यादी आजार होतात . त्यामुळे सोयाबीनचा आहारामध्ये वापर करण्या अगोदर अपौष्टिक घटक अकार्यक्षम करण्याची आवशक्यता असते.

उकळत्या पाण्यामध्ये सोयाबीन ब्लाचिंग करण्याची प्रक्रिया.. 

◼️ सोयाबीन स्वच्छ करून वाळवून घ्यावे.

◼️सोयाबीनची डाळ करून साल काढून टाकावी .

◼️ तीन लिटर पाणी घेऊन ते उकळल्यानंतर त्यात एक किलो सोया डाळ टाकावी. हे मिश्रण २५ मिनिटांपर्यंत उकळत ठेवावे .

◼️सोयाडाळ उकळत्या पाण्यातून काढून ती कडक उन्हामध्ये वाळत घालावी .

◼️त्यानंतर सोयाडाळीचा वापर पीठ किंवा भाज्या तयार करण्यासाठी उपयोग करू शकता

◼️चपाती बनवण्यासाठी ९ किलो गहू आणि त्यामध्ये प्रक्रिया केलेली १ किलो सोयाडाळ या प्रमाणात वापरावे.

सोया दूध

◼️ गिरणीतून सोयाबीनची डाळ तयार करून आणल्यावर साल वेगळी करावी. त्यानंतर ही डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी व त्या डाळीच्या तीन पट पाण्यामध्ये ६ ते ८ तास भिजवावी. परंतु उन्हाळ्यात ३ ते ४ तास भिजवावी.

◼️ डाळ स्वच्छ धुऊन घ्यावी १ किलो सोयडाळीसाठी ६ ते ८ लिटर उकळते पाणी घ्यावे व जाडसर बारीक मिक्सरमधून मिश्रण तयार करून घ्यावे . सोयडाळी हे बारीक केलेले मिश्रण १५ ते २० मिनिटे गॅसवर ठेवावे व सारखे हलवत राहून उकळून घ्यावे.

◼️त्यानंतर हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. चोथा बाजूला काढावा . त्यानंतर पाच मिनिटे गाळून घेतलेल्या दुधाला उकळावे. अशा प्रकारे सोया दूध तयार करता येते.

सोया पनीर (टोफू) निर्मिती

◼️ सोयादुधाला एक उकळी आणावी , २ ग्रॅम सायट्रिक अॅसिड एक लिटर सोया दुधामध्ये पाण्यात विरघळून टाकावे. त्यानंतर थोडेसे हलक्या हाताने हलवून ५ मिनिटे सोया दूध तसेच ठेवावे. थोड्याच वेळात दूध फाटते.

◼️ त्यानंतर मलमलच्या कापडातून हे फाटलेले दूध गाळून घ्यावे पाणी वेगळे करावे. या कापड्यामधील तील पनीर हे प्रेसच्या साचामधून दाबावे. त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे . अशा प्रकारे सोया पनीर (टोफू) तयार होते. तयार झालेले पनीर ५ ते १० मिनिटे थंड पाण्यात ठेवावे. नंतर पॅकिंग करून फ्रीजमध्ये ठेवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *