गूळनिर्मिती व्यवसायातून सुधारली घराची आर्थिक स्थिती ,वाचा सविस्तर ..

गूळनिर्मिती किंवा गुन्हाळघराची संस्कृती मुख्यत्वे कोल्हापूर जिल्हा, पुणे, सोलापूर किंवा पश्चिम महाराष्ट्रात विकसित झाली आहे. परंतु राज्यातील अन्य भागातील शेतकऱ्यांनी देखील या प्रक्रिया व्यवसायाचा पर्याय निवडून तो आर्थिकदृष्ट्या यशस्वी करण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. सेंद्रिय गुळाचे मार्केट ओळखून काहींनी ऊस उत्पादन व गूळ निर्मिती त्या पद्धतीची ठेवली आहे.

बोडखे यांनी केली गूळनिर्मिती.. 

जालना जिल्ह्यात बंधनापुर तालुक्यात असलेल्या सोमठाणा येथील बोडखे या कुटुंबानी नऊ एकर जमीन घेतली आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये भगवान दौलतराव बोडखे, पत्नी कविता, बंधू बंडू व त्यांची पत्नी जनाबाई असे सदस्य आहेत . पूर्वी भगवान यांचे वडील अन्य हंगामी किंवा कापूस पिके घ्यायचे. सन २००८ मध्ये त्यांनी पहिल्यांदाच एक एकर मध्ये ऊस ची लागवड केली . त्यांनी ऊस कारखान्याला देण्याऐवजी त्यापासून स्वत गूळनिर्मिती करण्याचे ठरविले.

टप्प्याटप्प्याने एक एकर उसाचे क्षेत्र गुन्हाळाच्या गरजेनुसार वाढवत पाच एकरापर्यंत नेले. सन २०१० ते २०१६ या कालावधीतील काही टप्प्यांवर गूळनिर्मिती काही प्रमाणात खंडित झाली. दौलतरावांचे निधन सन २०१६ मध्ये झाले. त्यानंतर वडिलांची ही परंपरा भगवान यांनी बंधू बंडू यांच्या मदतीने पुढे सुरू ठेवण्याचे ठरविले.

घरच्या संपूर्ण नऊ एकरात त्या दृष्टीने ऊस लागवड केली.आजमितिला उसाचे १०००१ , ३१०२ , ८००५ , ८६०३२ हे वाण घेतले जातात. ज्या वाहनांपासून जास्त गूळ तयार होईल त्याचे क्षेत्र जास्त व त्यापाठोपाठ अन्यवान लागवड असे तंत्र अवलंबिले आहे. खोडवा व निर्वाही घेण्यात येतो.

असा आहे गुळनिर्मिती व्यवसाय

कुटुंबातील चौघेही सदस्य आपल्या रेणुकामाता गुन्हाघराची उत्पादन निर्मिती ते विक्री असे सर्व जबाबदारी सांभाळतात. दरवर्षी दसरा किंवा विलंब झाल्यास दिवाळीच्या सुमारास गुन्हाळ सुरू होते. जून पर्यंत ते सुरू राहते.

स्वतःकडील नऊ एकरातील उसाव्यतिरीक्त दहा ते बारा शेतकऱ्यांकडून ऊस विकत घेण्यात येतो. यंदा प्रति टन दर सुमारे ३२०० रुपये देऊन ऊस खरेदी केला.लागवडीच्या उसाचे एकरी ६० ते ७० टन उत्पादन बोडखे यांना मिळते. रासायनिकपेक्षा सेंद्रिय घटक वापरण्यावर ऊस व गूळ उत्पादनात अधिक भर दिला जातो.गुन्हाळघरातील प्रत्येक कढई रसासाठी साधारणत: दीड टनापर्यंत ऊस लागतो. त्यापासून पावणेदोन क्विंटल गूळ तयार होतो.

सुमारे साडेतीन तासाचा हा एक कढई तापवलेल्या उसाच्या रसापासून गूळ बनविण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेला अवधी लागतो.दररोज सहा ते सात क्विटल गुळनिर्मिती होते. सकाळी ७ ते १० पर्यंत गुन्हाळघर सुरू असते. अर्थात, मजुरांचा उपलब्धतेवर त्यांची वेळ अवलंबून ठेवावी लागते.

थेट विक्रीव्यवस्था..

प्रत्येक कढईत तयार झालेल्या टाका पासून गूळ तयार करताना पहिल्या १०० ढेपा (भेल्या) एक किलो वजनाच्या असतात. सव्वा किलो, पाच किलो वजनी ढेपाही ग्राहकांची मागणी ओळखून तयार केल्या जातात. गुन्हाळघर हे जालना-छत्रपती संभाजीनगर मुख्य रस्त्यावरच बाजूलाच आहे. भोकरदन, सिल्लोड व राजूर आदी गावांना जाणारा हाच मार्ग आहे.

त्यामुळे लोकांची सतत ये-जा सुरू असते. हीच संधी ओळखून भगवान यांनी रस्ताकडेला स्टॉल उभारला असून तिथून थेट विक्री केली जाते. ग्राहकांच्या पसंतीस गुळाचा स्वाद उतरल्याने विक्रीला अडचण येत नाही.७० रुपये प्रति किलो असा दर गुळाचा ठेवला आहे. दीड किलो वजनी बॉटल पॅकिंगमधील काकवीची विक्री शंभर रुपये दराने होते. रेणुकामाता गुन्हाळ नावाने पीशव्याही तयार केल्या असून, गुळाच्या प्रचाराला त्यांची मदत होते.

व्यवसायाने दिले समाधान… 

वर्षभरातील काही महिनेच व्यवसाय सुरू असला, तरी तेवढ्या काळात २० ते २५ लाखापर्यंत व काही वेळा त्यापुढेही उलाढाल होते. मागणीनुसार साडेतीन हजार रुपये प्रत्येक कडई दराने गुळ तयारही करून देण्यात येतो. असे २५ ते ३० शेतकरी आपल्या संपर्कात असल्याचे भगवान सांगतात. चार ते पाच मजुरांना कायमस्वरूपी या व्यवसायातून रोजगार मिळाला आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुन्हाघराला भेट देऊन येथील गूळ खरेदी केला आहे. पारंपारिक पिकांना समाधानकारक दर नाहीत. त्यामुळे गूळनिर्मितीसारख्या पर्यायी व्यवसायाकडे वळलो. गुळाला चांगला दर मिळत असल्याने व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती होते. वास्तु उभारणे शक्य झाले. मुख्य म्हणजे कुटुंब खाऊन-पिऊन समाधानी ठेवणे शक्य झाले असल्याचे आव्हान यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *