गावात राहून सुरु करा ‘हा’ व्यवसाय सरकारकडून ही मिळत आहे अनुदान , जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती ..

अलिकडच्या काळामध्ये तरुणांना सरकार विविध व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे . तसेच सरकार व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ देण्याचे काम देखील विविध योजनांच्या माध्यमातून करत आहेत . तसेच , तुम्हाला जर व्यवसाय सुरु करायचा आहे तर नेमका कोणता व्यवसाय सुरु करावा? असा प्रश्न तुम्हाला सतत पडत असतो . तर गावात राहून तुम्ही माती परीक्षण केंद्र उघडू शकता. माती परीक्षण या व्यवसायासाठी सरकार 4.4 लाख रुपयांचे अनुदान देत आहे.

तुम्ही महिन्याला 15 ते 20 हजार रुपये मिळवू शकता

माती परिक्षणाचा व्यवसाय गावत राहून तुम्ही सहजपणे करु शकता.तुम्हाला यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. ज्या शेतकऱ्याच्या शेतातील मातीचे परिक्षण करायचे आहे, तो शेतकरी तुम्हाला माती आणून देईल. तुम्हाला त्यानंतर परिक्षण केंद्रावर मातीची तपासणी करावी लागेल. मातीची तपासणीसाठी संबंधीत शेतकऱ्याला 300 रुपये द्यावे लागतील. या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये तुम्ही महिन्याला मिळवू शकता.

मृदा आरोग्य कार्ड योजना..

माती परीक्षण केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने मृदा आरोग्य कार्ड नावाची योजना सुरू केली आहे . पंचायत स्तरावर लहान माती परीक्षण केंद्रे उघडण्यासाठी या योजनेंतर्गत सरकार अनुदान देत आहे . पंचायत आणि आजूबाजूच्या गावांच्या शेतातील मातीची चाचणी या लॅबमध्ये करण्यात येते . या मध्ये दोन प्रकारची माती परीक्षण केंद्रे आहेत. पहिली म्हणजे स्थावर माती परीक्षण प्रयोगशाळा, दुसरे म्हणजे दुकान भाड्याने घेऊन माती परीक्षण केंद्र सुरू करू तुम्ही गावातही हे दुकान सुरू करू शकता. तसेच दुसरी मोबाईल माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. या अंतर्गत, तुम्हाला एक गाडी (वाहन) घावे लागेल , जेणेकरून त्यामध्ये माती परीक्षण केंद्राची सर्व उपकरणे ठेवता येतील. तुम्ही गावोगावी जाऊन या वाहनाद्वारे माती परीक्षण करून चांगला नफा मिळवू शकता.

माती परिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी काय करावं लागेल?

केवळ 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोकच नियमानुसार मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत मिनी माती परीक्षण केंद्रे उघडू शकतात. तसेच, या योजनेचा लाभ घेण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त त्याला शेतीविषयी व कृषी चिकित्सालय याचे चांगले ज्ञान असावे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ती शेतकरी कुटुंबातील असणे गरजेचे आहे. जर लघु माती परीक्षण केंद्र उघडायचे असेल आणि तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कृषी कार्यालयात जाऊन उपसंचालक किंवा सहसंचालकांची भेट घ्यावी लागेल .

आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं…

माती परीक्षण केंद्र उघडण्यासाठी agricoop.nic.in वेबसाइट आणि soilhealth.dac.gov.in वर अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता. तुम्ही किसान कॉल सेंटर (1800-180-1551) वर अधिक माहितीसाठी देखील कॉल करू शकता. सर्व प्रथम कृषी अधिकारी तुम्हाला एक फॉर्म भरण्यासाठी देतील. तुम्हाला फॉर्मसोबत सर्व आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती कागद पत्रे कृषी विभागाकडे जमा करावी लागतील.

75 टक्के अनुदान…

5 लाख रुपयांची गरज पंचायत स्तरावरील माती परीक्षण केंद्र उघडण्यासाठी लागतात . पण माती परीक्षण केंद्र सॉईल हेल्थ कार्ड योजनेंतर्गत उघडल्यास सरकारकडून 75 टक्के अनुदान देण्यात येते . म्हणजे तुम्हाला 3.75 लाख रुपये सरकारकडून अनुदान म्हणून मिळतील. तुम्हाला तुमच्या खिशातून फक्त 1.25 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत . या योजनेची सर्वात महत्वाची बाब म्हणजे माती परीक्षण प्रयोगशाळा उघडण्यासाठी तुमचे स्वतःचे किंवा भाड्याचे कायमस्वरूपीचे घर असणे गरजेचेचे असते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *