5 गायीपासून दुग्ध व्यवसायाची सुरुवात,आज 46 गायींचा गोठा ; दररोज 650 लिटर दूध विकते, वाचा या महिलेची यशोगाथा…

अलीकडच्या काळामध्ये नवनवीन व्यवसायामध्ये अनेक तरुण-तरुणी उतरताना दिसत आहेत . आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यांना व्यवसायातून चांगला नफा मिळवत आहेत. दुग्ध व्यवसाय यातीलच एक व्यवसाय आहे . अशाच एका दुग्ध व्यवसायात यशस्वी झालेल्या महिलेची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. या महिलेने सुरुवातीला फक्त 5 गायींपासून सुरु केलेल्या व्यवसाय आज 46 गायींवर गेला आहे. या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून त्या दर महिन्याला लाखो रुपयांचा नफा कमावतात . आज जाणून घेऊया या महिलेची यशोगाथा

दूध डेअरीला दररोज 650 लिटर

उत्तम नियोजन आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर दुग्ध व्यवसाय देखील चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. या व्यवसायातून कमी खर्चात मोठा नफा मिळतो.राजेश्वरी या कर्नाटकमधील तुमकुरु जिल्ह्यातील कोरटागेरे तालुक्यातील आहेत . राजेश्वरी ताईंनी दुग्ध व्यवसायातून स्वत:ची प्रगती साधलीय. हा व्यवसाय सुरु केला तेव्हा सुरुवातीला राजेश्वरी यांनी 5 गायींपासून सुरुवात केली होती. आज त्यांच्या जवळ 46 गायी आहेत व दररोज 650 लिटर दूध डेअरीला जाते. या व्यवसायातून राजेश्वरी दरमहा 7 लाख रुपये कमवतात . अनेक पुरस्कार देखील त्यांच्या या दुग्ध व्यवसायाला मिळाले आहेत.

कमी खर्चामध्ये जास्त नफा..

राजेश्वरी ताईंनी सुरु केलेल्या व्यवसायाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 2019 साली यांनी दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांच्याकडे केवळ पाच गायी होत्या. परंतु , त्यानंतर त्यांनी हळूहळू गाई वाढवल्या . आता त्यांच्याकडे 46 गायी असून . 650 लिटर दूध त्या दररोज कर्नाटक मिल्क फेडरेशनला घालतात. त्या मोठा आर्थिक नफा या माध्यमातून होत आहे . जवळील  महिलानी त्यांचा आदर्श घेऊन दुग्ध व्यवसाय सुरु केला आहे. राजेश्वरी ताई अनेक महिलांना मार्गदर्शन देखील करत आहेत.

दुग्ध व्यवसाय कर असताना काय काळजी घ्यावी ?

आपल्याला दुग्ध व्यवसाय करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. या व्यवसायामध्ये गायींचे योग्य नियोजन केले तरच यशस्वी होता येते . या व्यवसायामध्ये सर्वात अगोदर गायीचे आरोग्य चांगले ठेवले पाहिजे . यामध्ये पशुवैद्यकीय उपचार करणे महत्वाचे आहे. चाराचे नियोजन करणे गरजेचे आहे . तसेच वेळोवेळी गायीला स्वच्छ पाण्यानं धुणे देखील गरजेचे असते. वेळच्या वेळी गायीला चारा पाणी करणे गरजेचे असते. तसेच गाईच्या गोठ्याची स्वच्छता राखणे अतिशय महत्वाचे आहे. हिरवा चारा योग्य प्रमाणात देणे देखील आवश्यक आहे अशी माहिती राजेश्वरी यांनी दिली . राजेश्वरी यांनी भाडेतत्वावर जमिन घेतली कारण गायींना योग्य प्रकारचा चारा मिळावा म्हणून . या जमिनीतून जनावरांना चाराही करता येतो व इतर उत्पन्नही घेता येत . राजेश्वरी यांच्याकडे होल्स्टीन फ्रिजियन व जर्सी जातीच्या गायी आहेत.उच्च दुधासाठी या गायी ओळखल्या जातात.

उन्हाळ्यामध्ये पाण्याची मोठी कमतरता असल्यामुळे गायींच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो.त्यामुळे त्यांना जनावरांसाठी जवळच्या जिल्ह्यातून चाऱ्याची खरेदी करावी लागत असते . राजेश्वरी ताईंना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Reply