शेतीचे क्षेत्र कमी आहे, पण उत्पन्न जास्त हवे आहे, तर वाचा अभिनव क्लबचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके यांची यशोगाथा!

शेतीचे क्षेत्र कमी आहे, पण उत्पन्न जास्त हवे आहे, तर वाचा अभिनव क्लबचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके यांची यशोगाथा!

ज्ञानेश्वर बोडके अभिनव क्लब चे संस्थापक अध्यक्ष यांची यशोगाथा आपण आज पाहणार आहोत . त्यांचे एकूण सभासद 1लाख 3000 आहेत . वार्षिक उलाढाल 400 कोटी रुपये, त्यांचा व्यवसाय शेती आहे. 

शेतकऱ्यांच्या मुलांनी चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेऊन इकडे तिकडे नोकरीसाठी वळून नोकरी करण्यापेक्षा आपल्या शेतावर छोट्या-मोठ्या पद्धतीने शेती हा व्यवसाय समजून काम केले, तर नोकरीची गरज लागणार नाही. ज्या दिवशी शेतकऱ्यांनी शेती करायची थांबवली तर जगातील सर्व माणसे उपाशी मरतील , तुम्हाला तर माहितीच आहे. पण एखादा पिक्चर निघायचा थांबला तर कोणी उपाशी मरणार नाही. लोक पिक्चर मधल्याच माणसांना हिरो समजतात . शेतकऱ्यांना हिरो समजत नाहीत.

ज्ञानेश्वर बोडके यांनी दहावी झाल्यानंतर एका खाजगी कंपनीमध्ये दहा वर्ष नोकरी केली . त्याच वेळी त्यांना एका वृत्त पत्रामध्ये एक आर्टिकल वाचायला मिळाले की, एका सांगलीच्या शेतकऱ्यांने दहा गुंठ्यांमध्ये एका वर्षात बारा लाख रुपये कमावले ,हे आर्टिकल वाचल्यानंतर ज्ञानेश्वर बोडके हे त्या शेतकऱ्याकडे गेले व त्यांची शेती पद्धती समजून घेतली, व नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला . वर्षभर ते सकाळी सात वाजता सायकलवर 17 किलोमीटर ते त्या शेतकऱ्याकडे जायचे व संध्याकाळी सात वाजता परत यायचे त्यांना यातून काहीच पैसे मिळाले नाही परंतु कोट्यावधी रुपयांचे तंत्रज्ञान मात्र मिळाले .

हे तंत्रज्ञान (प्रोजेक्ट) आपण या लेखातून पाहणार आहोत .हा प्रोजेक्ट फक्त एक एकर शेतीचा आहे. या प्रोजेक्टला 13 ते 14 लाख रुपये लागतात . ते जर आपण फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले, तर फक्त सात ते आठ हजार रुपये महिन्याला मिळतील . परंतु या प्रकारची शेती केली तर महिन्याला 40 ते 50 हजार रुपये मिळतील . या प्रोजेक्टमध्ये दहा गुंठ्यामध्ये पॅलिहाऊस म्हणजेच संरक्षित शेती ज्याच्यामध्ये उन्हाळा, हिवाळा ,पावसाळा, हे तिन्ही ऋतू कंट्रोल करून दररोज त्यांच्या घरात हजार रुपये येत होते . पहिल्या दहा गुंठ्यामध्ये ते इंग्लिश भाजीपाल्या मध्ये दररोज वीस किलो भाजीपाला काढला व त्याला पन्नास रुपये जरी दर मिळाला तरी यामधून हजार रुपये मिळतात .

त्यांनी दुसऱ्या दहा गुंठे मध्ये वेलवर्गीय पिके सुरू केले ,त्यामध्ये कारले ,तोंडली, दोडके, काकड्या, ही पिके रोज दोन दोन किलो काढली यालाही 30 किलो रुपयाचा रेट मिळाला तरीही तुम्हाला तीनशे रुपये दररोजची मिळतात.

शेतीचे क्षेत्र कमी आहे, पण उत्पन्न जास्त हवे आहे, तर वाचा अभिनव क्लबचे चे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके यांची यशोगाथा!

तिसऱ्या दहा गुंठ्या मध्येही त्यांनी भेंडी ,गवार ,फ्लॉवर, कोबी, अशा भाज्यांची लागवड केली यातून त्यांना रोज दहा दहा किलो फळभाज्या निघायला लागल्या, याला वीस रुपयांचा दर मिळाला यामधून त्यांना रोजचे दोनशे रुपये मिळायला लागले.

चौथ्या व शेवटच्या प्लॉटमध्ये त्यांनी आठ गुंठ्यावर पालक, शेपू ,मेथी ,लालमाठ ,अशा पालेभाज्यांची लागवड केली त्यामधून रोजच्या प्रत्येकी पाच पाच जुड्या भाजी ते काढायचे व त्या एका जोडीला सात रुपयांचा रेट मिळाला यामधून त्यांना दोनशे रुपये मिळायचे त्यांनी एकूण 38 गुंठेच क्षेत्र वापरून त्यांना रोजचे 1700 रुपये मिळायला लागले .

आणखीन त्यांच्याकडे दोन गुंठे जागा शिल्लक होती त्यांनी एका गुंठ्यामध्ये पॅक हाऊस तर एका गुंठ्यात एक गाई ते सांभाळत होते. ती गाई रोजचे दहा ते बारा लिटर दूध देते.  त्यामधील ते दोन लिटर दूध घरामध्ये वापरण्यास ठेवतात व उरलेले दूध पॅकिंग करून पन्नास रुपये लिटरने आजू बाजूच्या परिवाराला ते विकत असत याच्यामधून त्यांना रोजचे पाचशे रुपये मिळतात.

गाईचे गोमूत्र च्या शंभर शंभर एम एल च्या बाटल्या तयार करून त्या दहा रुपयात विकून त्यामधून ते रोजची दोनशे रुपये कमवतात, रोजच्या ते 20 बाटली विकत. गाईचे शेणा पासून गौऱ्या तयार करतात व त्या विकून त्यांना दोनशे रुपये मिळतात.  तर एकच गाई रोजचे आठशे रुपये कमवून देते.  या प्रोजेक्ट मधून रोज पंचवीसशे रुपये मिळायला लागले . हायटेक शेतीचा अर्थ आहे की कमीत कमी पाणी कमीत कमी वीज 100% विषमुक्त अन्न निर्माण करायचे व थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे यालाच हायटेक शेती म्हणतात हायटेक म्हणजे करोड रुपये लावा व तोट्यात घालवा याला हायटेक म्हणायचं नाही हे त्यांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *