ऊसउत्पादक शेतकऱयांसाठी आनंदाचीबातमी, ऊस तोडणी यंत्रासाठी  मिळणार अनुदान !

Agriculture News : महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यात ऊस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. मात्र दरवर्षी ऊस उत्पादकांना ऊस तोडणी साठी नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये मजूर टंचाई ही सर्वात मोठी अडचण म्हणून गेल्या काही वर्षांपासून समोर येत आहे. मजूरटंचाईवर मात करायची असेल तर यांत्रिकीकरणाचा वापर वाढवायला हवा. यासाठी ऊस तोडणी यंत्राची गरज भासते.

ऊस तोडणी यंत्र साहजिकचं कमी किमतीत उपलब्ध होत नाहीत यामुळे यासाठी शासनाकडून अनुदानाची आवश्यकता असते. दरम्यान आता केंद्र शासनाने आपल्या राज्याला विशेष भाग म्हणून ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी 192 कोटी 78 लाख रुपये मंजूर केले आहेत. सदर मंजुरी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाचा 128 कोटींचा राज्य हिस्सा राहणार आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना या योजनेसाठी 320 कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. हा निधी पुढील दोन वर्षांसाठी उपलब्ध राहील. तसेच यातून राज्यात नव्याने 900 ऊस तोडणी यंत्र उपलब्ध होतील. याचा वैयक्तिक शेतकरी उद्योजक आणि साखर कारखान्यांना लाभ दिला जाणार आहे.

या ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी महाराष्ट्रातून केंद्रात जाणारे नितीन गडकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे. निश्चितच त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील प्रयत्न केले आहेत. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सद्यस्थितीला महाराष्ट्रात आठशे ते सव्वा आठशे ऊस तोडणी यंत्र आहेत.

आता त्याने 900 ऊस तोडणी यंत्रसाठी 320 कोटींचे अनुदान मिळणार असल्याने राज्यात 1700 हुन अधिक ऊस तोडणी यंत्र उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे ऊसतोड मजुरांचा अभाव तोडणीसाठी प्रभावी ठरणार नसून गळीत हंगामात अधिका अधिक उसाचे गाळप होणार आहे तसेच अतिरिक्त उसाचा प्रश्न देखील यामुळे कुठे ना कुठे संपुष्टात येण्यासाठी मदत होणार आहे. निश्चितच याचा ऊस उत्पादकांना फायदा होणार आहे, या व्यतिरिक्त यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *