कांद्याला गेल्या तीन-चार दिवसांपासून शेतकऱ्यांना दिलासादायक असा बाजार भाव मिळत असल्याचे चित्र आहे. आज राज्यभरातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 48000 क्विंटलची आवक झाली. सरासरी 1600 रुपयांपासून ते 2300 रुपयांपर्यंत लाल कांद्याला भाव मिळाला. तर सरासरी 1600 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत उन्हाळ कांद्याला भाव मिळाला.
पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज ७ जून 2024 रोजी च्या उन्हाळ कांद्याची एकट्या नाशिक जिल्ह्यात 96 हजार क्विंटल इतकी आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1600 रुपयांपासून ते 2450 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वाधिक दर मिळाला. सोलापूर बाजार समितीत आज लाल कांद्याला 2100 रुपये धुळे बाजारात 1900 रुपये . तर 2100 रुपये तर हिंगणा बाजार समितीत दर मिळाला . साक्री बाजारामध्ये सर्वाधिक 2350 रुपयांचा दर मिळाला.
तर आज येवला बाजारात उन्हाळ कांद्याला 2200 रुपये, लासलगाव बाजारात 2400 रुपये, नाशिक बाजारामध्ये 2050 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 2451 रुपये, संगमनेर बाजारात सर्वाधिक कमी 1625 रुपये,सिन्नर बाजारात सर्वाधिक 2550 रुपये, सटाणा बाजारात 2315 रुपयांचा दर मिळाला.
कांद्याचे सविस्तर बाजार भाव खालील प्रमाणे