Kanda Rate : आज मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी पुण्याच्या खेड-चाकण बाजारसमितीत लाल कांद्याला कमीत कमी १५०० रुपये जास्तीत जास्त २५०० रुपये, तर सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर पुणे पिंपरी बाजारसमितीत सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
दरम्यान काल सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारभाव पुन्हा वर चढल्याचे जाणवले, शनिवारी हेच बाजारभाव काहीसे घसरलेले होते. आता ते स्थिरावल्याचे चित्र आहे. उन्हाळी कांद्यालाही बाजारभाव बरे मिळत असल्याचे दिसून येत आहे.
सोमवारी राज्यातील एकूण कांदा आवक कमी राहिली. राज्यात एकूण २ लाख २२ हजार क्विंटल कांदा आवक झाली. रविवारी ती १ लाख ८ हजार क्विंटल इतकी होती. मागच्या सोमवारी १७ फेब्रुवारीला राज्यातील कांदा आवक ही २ लाख ६६ हजार क्विंटल होती, तर शनिवारी १ लाख ९० हजार क्विंटल होती.
दरम्यान सोमवारी लासलगाव निफाड बाजारसमितीत लाल कांद्याला सरासरी २५०० रुपये प्रति क्विंटल, तर लासलगाव विंचूर बाजारसमितीत २३५१ रुपये क्विंटल असे होते. उन्हाळी कांद्याला लासलगावच्या निफाड आणि विंचूर बाजारसमितीत अनुक्रमे २२४० रुपये आणि २४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. कोपरगावला उन्हाळी कांदयाला २३५० रुपये प्रति क्विंटल, तर नाशिक जिल्ह्यातील नामपूर करंजाड बाजारात सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटल दर उन्हाळी कांद्याला मिळाला.












