Onion Rate : बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी नाशिकच्या बाजारात उन्हाळी कांदा दाखल झाला आहे. लवकरच उन्हाळी कांद्याची हळू हळू आवक वाढणार असून खरीप आणि लेट खरीपाचा कांदा आता जवळपास संपत आलेला आहे.
नाशिक बाजारसमितीत काल १६७२ क्विंटल उन्हाळी कांदा दाखल झाला, तर नगर जिल्ह्यातील अकोले बाजारातही २९६ क्विंटल उन्हाळी कांदा दाखल झाला. अकोले येथे कमीत कमी ५००, जास्तीत जास्त ३३११ तर सरासरी २७०० रुपये बाजारभाव मिळाला. नाशिक येथे किमान १०० जास्तीत जास्त २८६१ आणि सरासरी २३५० असा बाजारभाव मिळाला.
दरम्यान बुधवारी राज्यातील एकूणच कांदा आवक घटलेली दिसून आली. नाशिक जिल्ह्यात सुमारे ६१ हजार क्विंटल कांदा आवक झाली, पुणे जिल्ह्यात सुमारे ५ हजार क्विंटल, नगर जिल्ह्यात सुमारे १५ हजार क्विंटल, तर सोलापूर जिल्ह्यात सुमारे २२ हजार क्विंटल आवक झालेली दिसून आली. राज्यात सुमारे १ लाख ३० हजार क्विंटल कांदा आवक झाली. मंगळवारी २ लाख १० हजार क्विंटल आवक होती.
बुधवारी लासलगावच्या निफाड बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १२०० रुपये, जास्तीत जास्त ३ हजार आणि सरासरी २८२५ रुपये बाजारभाव मिळाला, पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांदयाला कमीत कमी ८००, जास्तीत जास्त ३१०० आणि सरासरी २६०० रुपये बाजारभाव मिळाला. पुणे जिल्ह्यातील खेड-चाकण बाजारात सरासरी २५०० रुपये बाजारभाव मिळाला, सोलापूरमध्ये कमीत कमी ३०० तर जास्तीत जास्त ३८०० रुपये बाजारभाव मिळाला. सरासरी २ हजार रुपये बाजारभाव प्रति क्विंटलसाठी येथे मिळाला.02:34 PM












