केंद्र सरकारचा मोठा निर्णय,उसापासून इथेनॉल बनवण्यावरील बंदी हटवली, ऊस उत्पादकांसह साखर कारखान्यांना दिलासा,

उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली .राज्यातील साखर कारखान्यांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे मुख्यमंत्री केंद्र शासनाचे एकनाथ शिंदे यांनी आभार मानले आहेत.ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने आणि शेअर बाजारातील साखर निर्मिती कंपन्या यांना केंद्राच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.

आता नव्या हंगामामध्ये उसाचा रस, सिरप, बी हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल निर्मिती राज्यातील साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरीजना करता येणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे साखर कारखाने व डिस्टिलरीजना मोठा दिलासा मिळणार आहे .

केंद्र सरकारने गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे निर्बंध हटवण्यासाठी आणि साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी मिळावी यासाठी वेळोवेळी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. आता राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे तसेच गाळप हंगामात केंद्र शासनाने इथेनॅाल निर्मितीवर घातलेले निर्बंध उठवले आहेत.

1 नोव्हेंबरपासून निर्णय लागू होणार..

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात केंद्राने इथेनॉलवर बंदी घातली होती.केंद्र सरकारच्यावतीने उसापासून इथेनॉल बनवण्यावरील बंदी 29 ऑगस्टला एक नोटिफिकेशन काढून पूर्णपणे हटवली आहे. परंतु हा निर्णय 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. विरोधी पक्ष त्या निर्णयानंतर आक्रमक झाले होते. त्यानंतर साखर कारखान्यांना विशिष्ट मर्यादेपर्यंत इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी दिली होती .

देशात इथेनॉलच्या उत्पादनाला सरकारचा प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. इंधनात इथेनॉल मिसळण्यासाठी भारत सरकारने धोरण ठरवलेले आहे. त्यानुसार पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जाते. पुढील काळात ते डिझेलमध्ये देखील मिसळले जाईल. या निर्णयामुळे इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल.

इथेनॉल निर्मिती धोरणातील बदलानंतर साखर निर्मिती कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळाली .या निर्णयानंतर बलरामपूर साखर, बन्नारी अम्मन शुगर्स, अवध शुगर, बजाज हिंदुस्तान शुगर, धामपूर शुगर मिल्स या कंपन्याच्या शेअर्समध्ये 8-9 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले .. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *