Maharashtra CM & Eknath Shinde : राज्याच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे आणि अजितदादाही होणार मुख्यमंत्री्? असा ठरला फॉर्म्युला?

Maharashtra CM & Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपाने सर्वाधिक १३२ जागा मिळवून मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर होत्या. इतकेच नव्हे शिंदे हे वेगळा रस्ता निवडतील किंवा मंत्रीमंडळात सहभागी होणार नाहीत अशाही चर्चा होत्या. त्यातून राज्याचे राजकारण तापले होते.

उद्या दिनांक ५ डिसेंबर रोजी राज्याच्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होत आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर होत असलेल्या या सोहळ्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसह अनेक राज्यातील मुख्यमंत्री, अध्यात्मिक साधू संत, उद्योग क्षेत्रातील धुरिणांना निमंत्रण आहे. मात्र भाजपाने अजूनही आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण किंवा महायुतीकडून कोण मुख्यमंत्री होणार हे जाहीर केले नाही. त्याची घोषणा आज दिनांक ४ डिसेंबर रोजी होऊ शकते.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या विश्वासू सहकाऱ्याला म्हणजेच दादाजी भुसे यांना उपमुख्यमंत्री करायचे आणि आपण पक्षाचे काम करायचे असे त्यांची ठरविले असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत होते. मात्र आता त्यांनी आपली भूमिका बदलली असून सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदासह नगरविकास खाते स्वीकारणार आहेत. याशिवाय अन्य महत्त्वाची १५ खाती त्यांनी भाजपाकडे मागितली आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला अर्थमंत्रालयासह, उपमुख्यमंत्रीपद मिळणार असून त्यांच्या पक्षाने १० ते १२ मंत्रिपदांची मागणी केली असल्याचे समजते.

मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला..

दरम्यान भाजपाच्या एका राजकीय पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपद तीनही पक्षांना दिले जाणार असून दोन, दोन आणि १ वर्ष असा सत्तेचा फार्म्युला ठरला असल्याचे समजते. त्यात पहिली दोन वर्ष मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असेल, नंतरची दोन वर्षे एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि शेवटचे एक वर्ष अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद बहाल केले जाण्याची शक्यता आहे. मात्र याबद्दल लवकरच अधिकृत माहिती समजेल, तोपर्यंत तरी मुख्यमंत्रीपदाबद्दल सस्पेन्स कायम राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *