Soybean Bajarbhav : या संपूर्ण आठवड्यात राज्यात सोयाबीनला सरासरी ३८०० ते ४२०० रुपयांचा बाजारभाव मिळाल्याचे दिसून आले. शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी राज्यात सोयाबीनची एकूण ५४ हजार १८९ क्विंटल आवक झाली. सोमवार ते शुक्रवार दरम्यान राज्यात सोयाबीनची सरासरी सव्वा लाख क्विंटल आवक दररोज होत आहे.
शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनची सुमारे दीड हजार क्विंटल आवक झाली. या ठिकाणी किमान बाजारभाव ३७६१, सरासरी बाजारभाव ४०५२ रुपये प्रति क्विंटल असा होता. पांढऱ्या सोयाबीनला लातूर बाजारात सरासरी ४२९१ रुपये बाजारभाव मिळाला. शनिवारी किनवट बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनची ११० क्विंटल आवक झाली. याठिकाणी सरासरी ४८९२ रुपये इतका उच्चांकी दर इतर बाजाराच्या तुलनेत मिळाला.
किनवट बाजाराच्या खालोखाल मुखेड बाजारात सरासरी ४४०० रुपये, उदगीर बाजारात सरासरी ४३३३ रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांक दर पिवळ्या सोयाबीनला मिळाला.
दरम्यान राज्यात अमरावती बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक म्हणजेच ८३७९ क्विंटल इतकी आवक झाली. याठिकाणी किमान दर ४ हजार रुपये तर सरासरी ४०७६ रुपये प्रति क्विंटल असा होता. उदगीर बाजारात ५६०० क्विंटलची आवक झाली. जालना बाजारात ५७४० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान दर ३३०० तर सरासरी ४२०० रुपये इतका मिळाला.
अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनची सुमारे ५ हजार क्विंटल आवक झाली आणि कमीत कमी ३६०० रुपये तर सरासरी ४२०० रुपये सोयाबीनला प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.