Future Commodity price: जानेवारीनंतर कापूस-सोयाबीन-हरभरा आणि तूरीचे दर कसे असतील

future-commodity-price

Future Commodity price: जानेवारीनंतर कापूस-सोयाबीन-हरभरा आणि तूरीचे दर कसे असतील

सध्या कापूस आणि सोयाबीनच्या किंमती हमीभावापेक्षा कमी आहेत. शेतकऱ्यांना या किंमती वाढण्याची प्रतिक्षा असल्याने अनेकांनी कापूस, सोयाबीन, मका साठवून ठेवला आहे.

जानेवारी ते मार्च महिन्यात कापूस, सोयाबीन, मका, तूर आणि हरभरा या पिकांच संभाव्य दर कसे असतील याचा सुधारित अहवाल कृषी विभागाच्या स्टार्ट ॲग्रीकल्चर प्रकल्पातील बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार महत्त्वाच्या पिकांच्या संभाव्य किंमती पुढीलप्रमाणे असतील.

अशा असतील किंमती:
मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाअंतर्गत” शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीतील निवडक पिकांच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे-

मका : रु. २००० ते २५०० प्रति क्विं.,
तूर : रु. ९००० ते १०५०० प्रति क्विं.
हरभरा : रु. ६५०० ते ८००० प्रति क्विं
सोयाबीन : रु. ४४०० ते ५००० प्रति क्विं.
कापूस : रु. ७५०० ते ८५०० प्रति क्विं.

दरम्यान सदर अहवाल हा बाजाराची सद्यस्थिती व भविष्यकालीन किंमती विषयक अनुमान दर्शिवतो. आंतरराष्ट्रीय किंमती, हवामान, आर्थिक घटक, आणि सरकारी धोरण या घटकांमध्ये होणाऱ्या बदलामुळे संभाव्य किंमतीमध्ये बदल होऊ शकतो. परिणामी वास्तविक किंमती या संभाव्य किंमती पेक्षा वेगळ्या असू शकतात, त्यामुळे वाचकांनी या अहवालाचा काळजीपूर्वक वापर करावा, असाही वैधानिक इशारा संबंधित विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.

Leave a Reply