राज्यात ऑगस्ट महिना कोरडा जाणार, दोन महिने मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज, भारतीय हवामान विभागाचा अंदाज..

राज्यात ऑगस्ट महिना कोरडा जाणार, दोन महिने मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

 देशभरात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात सामान्य राहण्याची शक्यता . जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पण पुढील दोन महिने सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मान्सूनचा पुढील दोन महिन्यासाठीचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेला आहे.भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिना कोरडा जाणार, ऑगस्ट चा पहिला आठवडा सोडला तर राज्यात पाऊस कोसळण्याची शक्यता कमी आहे.  असे हवामान विभागाने म्हटले, देशात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता याशिवाय राज्यात देखील सरासरी पेक्षा कमी पाऊसचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.

महाराष्ट्र मध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे या दोन्ही महिन्यात मान्सून हा सामान्य राहील. मान्सून मध्ये एल निनो चा प्रभाव वाढणार मात्र दुसरीकडे आय ओडी पॉझिटिव्ह राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एल निनो चा मान्सून मागील दोन महिन्यात कोणताही प्रभाव नाही. आयओडी न्यूट्रल आणि पॉझिटिव्हकडे सरकत असल्याने मागील दोन महिन्यात चांगला पाऊस आला आहे

राज्यातील दिवस पावसाची शक्यता

मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी पावसाने थोडीफार उसंत घेतली आहे. परंतु ऑगस्टच्या सुरुवातीला तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. महाराष्ट्र मध्ये दोन तीन आणि चार ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.

राज्यात ऑगस्ट महिना कोरडा जाणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. ऑगस्ट चा पहिला आठवडा सोडला तर राज्यात पाऊस कोसळण्याची शक्यता कमी आहे. असे हवामान विभागांनी म्हटले आहे. विदर्भ, महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .2 ऑगस्ट रोजी विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे . तीन ऑगस्ट रोजी कोकण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अति मुसधारेचा अंदाज आहे.

दरम्यान पुढील पाचही दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी राहणार आहे.  चार ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील जालना, छत्रपती संभाजी नगर,  परभणीत, विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *