Onion Rate : बाजार समितीमध्ये नवीन उन्हाळ कांद्याची अवाक सुरु झाली ,किती मिळतोय दर जाणून घ्या सविस्तर ..

पाऊस कमी असल्यामुळे कसमादे भागामधील काही शेतकऱ्यांनी पाणीटंचाई लक्षात घेऊन आगाप उन्हाळ कांदा लागवडी केल्या होत्या. त्यामुळे त्याची काढणी सुरू झाली आहे. सटाणा बाजार समितीमध्ये नवीन रब्बी उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. नवीन उन्हाळ कांद्याला क्विंटलला सरासरी ११८० रुपये दर मिळाला आहे. उन्हाळ कांद्याला खरीप कांद्याच्या तुलनेत क्विंटलमागे १५० रुपये जास्त दर मिळत आहे.

भूषण केदा सोनवणे हे सटाणा येथील शेतकरी आहेत . यांनी ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या आठवड्यात ४ एकर जमीनीवर उन्हाळ कांद्याची आगाप लागवड केली होती. ११५ दिवसानंतर त्यांचा कांदा काढणीला आला आहे. त्याची विक्री सटाणा बाजार समितीमध्ये केली. खरिप कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याला १५० रुपये जास्तीचा दर मिळत आहे.

सोनवणे यांच्या कांद्याची सोमवारी पासून अवाक सुरु झाली.  पहिल्या दिवशी दोन खेपेमध्ये अनुक्रमे ३५ व ३१ अशी एकूण ६८ क्विंटल इतकी आवक झाली. त्या कांद्याला प्रतिक्विंटल ११८१ रुपये दर मिळाला. दुसऱ्या दिवश तीन खेपेत अनुक्रमे ३५,२५ व २५ क्विंटल अशी एकूण ८५ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ११८० रुपये इतका दर मिळाला.

सोनवणे यांच्या नवीन उन्हाळ कांद्याचा रंग नेहमीसारखाच मध्यम फिकट गुलाबी आहे व त्याचा आकार ४० ते ५० मिमी व गोल्टी आहे. कांद्याला हवामान प्रतिकूल असल्यामुळे एकरी त्यांना ११० क्विंटल उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे उत्पादनात ३० टक्के घट आहे.

दरवाढीची अपेक्षा होती म्हणून गेल्या वर्षी उन्हाळ कांदा चाळीत साठवला होता .परंतु दर वाढतील याची वाट पाहून कांदा चाळीतच सडला. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी यंदा आगाप लागवड केली व काढणीपश्चात लगेच विकला. नवीन उन्हाळ कांद्याला खरीप कांद्याच्या तुलनेत जास्त दर आहे. परंतु क्विंटलमागे १५०० ते २,००० रुपयांचा फटका निर्यातबंदीमुळे बसला आहे. .
– भूषण सोनवणे, कांदा उत्पादक

उन्हाळ कांदा चालु वर्षी २ ते ३ आठवडे बाजारात आला. परंतु तुलनेत दर कमी आहेत. मार्चमध्ये आवक वाढेल.
– भास्कर तांबे, सचिव, सटाणा बाजार समिती, जि. नाशिक.

Leave a Reply