
PM Kisan installment : अलीकडेच पीएम किसान योजनेचा १९वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या पुढच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. पीएम किसान योजनेचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेला आर्थिक आधार पुरवणे आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन शेती कार्यांसाठी अधिक मदत मिळते. २०व्या हप्त्याच्या रकमेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना नियमानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (पीएम किसान योजना) शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आर्थिक आधार आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुच्या मदतीचे तीन हप्ते दिले जातात, प्रत्येक हप्ता २,००० रुचा चा असतो.
या हप्त्याच्या निधीचे थेट बँक खात्यात वितरण केले जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम त्वरित मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. शेतकऱ्यांना eKYC करण्यासाठी OTP आधारित प्रणालीचा वापर केला जातो, किंवा ते नजीकच्या सीएससी केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. eKYC प्रक्रिया पूर्ण न झाल्यास २०व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.
पीएम किसान योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी दरवेळी अद्ययावत केली जाते. शेतकऱ्यांना त्यांच्या नावाची यादी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपासता येते. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना २०व्या हप्त्याचा लाभ मिळेल. दरम्यान शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता जून २०२५ मध्ये मिळणार आहे. मात्र त्यासाठी त्यांनी केवायसीसह अनेक प्रक्रिया पूर्ण करायला हव्यात.