कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ एका कारणामुळे कांद्याच्या दरात येणार तेजी, किती वाढणार भाव?

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ एका कारणामुळे कांद्याच्या दरात येणार तेजी, किती वाढणार भाव?

कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ,ती म्हणजे भारत – बांगलादेश सीमा खुली झालेली आहे. रविवारपासूनच म्हणजे 4 जून रोजी ही सीमा खुली झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विशेष करून नाशिक मधील कांदा बांगलादेशाला निर्यात करणे सोपे झालेले आहे.

महाराष्ट्र मध्ये खूप शेतकरी कांदा या पिकावर अवलंबून आहेत. राज्यातील अहमदनगर, सांगली, कोल्हापूर ,सातारा ,नाशिक, पुणे या सर्व जिल्ह्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याशिवाय खानदेशातील जळगाव नंदुरबार, धुळे या जिल्ह्यातही कांद्याची लागवड केली जाते . राज्यातील काही भागांमध्ये कमी जास्त प्रमाणात कांद्याची लागवड होते . परंतु काही दिवसांमध्ये कांदा उत्पादक शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडलेले आहेत . कांद्याला पाहिजे तेवढा भाव मिळालेला नाही. त्यामुळे दर वाढतील याची शेतकऱ्यांना आशा आहे . सर्व शेतकऱ्यांचा लाल कांद्याला केलेला खर्च देखील वसूल झालेला नाही.

मार्च 2023 पासून भारत -बांगलादेश यांची सीमा बंद होती

आता शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा बाजारात खूप मोठ्या प्रमाणात वर येत असून उन्हाळी कांद्याला देखील पाहिजे तेवढा दर मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडलेले आहेत. अशातच शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे . भारत – बांगलादेश सीमा खुली झालेली आहे. त्यामुळे निर्यात करणे सोपे झाले आहे . या निर्यातीमुळे कांदादरात 300 ते 400 रुपये प्रतिक्विंटल दरवाढ होईल असे व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे . मार्च 2023 पासून भारत -बांगलादेश यांची सीमा बंद होती. त्यामुळे नाशिक जिल्ह्यामधून बांगलादेशांत पाठवण्यात येणारा कांदा निर्यात करण्यासाठी व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. या निर्यातीत अडचणी येत असल्या कारणामुळे राज्यांमधून बांगलादेशांत कांदा निर्यात कमी प्रमाणात होत होती याचाच परिणाम देशांमध्ये कांदा साठा वाढला होता. व त्याचाच फटका कांद्याच्या दरामध्ये होत होता.

300 ते 400 रुपये प्रतिक्विंटल कांद्याच्या दरात वाढ

आता मात्र ही सीमारेषा खुली झाली असल्यामुळे महाराष्ट्र संपूर्ण भारतातून बांगलादेशांत मोठ्या प्रमाणात निर्यात करणे सोपे झालेले आहे. यामुळे कांद्याच्या दरामध्ये जवळपास 300 ते 400 रुपये प्रतिक्विंटल इतकी दरवाढ होऊ शकते . कांदा व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार बांगलादेशामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक झाले असल्यामुळे, बांगलादेश सरकारने मार्च 2023 पासून कांद्याचे आयात बंद केली होती . त्यामुळे नाशिक जिल्ह्याचा कांदाबांगलादेशांत पाठवणे बंद झाले होते . याचाच फटका सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता व दरामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती. मात्र आता बांगलादेशामध्ये कांद्याचा साठा हा कमी राहिल्यामुळे बांगलादेशाने आता आयात करण्यासाठी परवानगी दिली असून रविवारपासून ही सीमा खुली करून दिली आहे . यामुळे कांदा दरामध्ये देखील तेजी येण्याची शक्यता आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *