केरळमध्ये मान्सून पाच व सहा जूनला दाखल होणार आहे. त्याचप्रमाणे अरबी समुद्रात पुढील 24 तासात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन मान्सूनची शाखा सक्रिय होणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर दिशेला आठ व नऊ जूनला चक्रीवादळ निर्माण होईल.
याचाच परिणाम 9 जून पासून मध्य महाराष्ट्र ,कोकण ,कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली ,अहमदनगर संभाजीनगर ,पुणे, तसेच उत्तरेकडे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होणार आहे. याचप्रमाणे विदर्भ मराठवाडा या भागात देखील पाऊस होण्याची शक्यता आहे कोकणात 12 जून नंतर मान्सून दाखल होईल.
यानंतर मान्सून कमी होईल. मात्र काही भागांमध्ये पाऊस सुरूच राहील. कोकण विभागात जून मध्ये पाऊस जास्त राहील. विदर्भ व मध्य भारतात 22 जूनला मान्सून सक्रिय होईल.
राज्यात त्या काळात जोरदार पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, संभाजीनगर अहमदनगर जळगाव धुळे, पुणे या ठिकाणी सर्वत्र ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र मध्ये 10 जून पर्यंत पाळीव पावसाचा जोर वाढेल.