शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. मंगळवारपर्यंत भारतातील टोमॅटोच्या सरासरी किरकोळ किमतीत एका महिन्यापूर्वीच्या तुलनेत 70% आणि एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 168% वाढ झाली आहे. आल्याला देखील बाजारात चांगली मागणी आहे.
गेल्या पंधरवड्यात टोमॅटो आणि आले यांसारख्या स्वयंपाकघरातील आवश्यक घटकाच्या दरात चांगली वाढ झाली आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा उत्तर भारतातील टोमॅटो पिकावर परिणाम झाला असताना, दुसरीकडे आले शेतकरी त्यांचे पीक रोखून धरत आहेत आणि गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई भरून काढण्यासाठी भाव वाढू देत आहेत.
महाराष्ट्रात काही बाजार समिती मध्ये आल्याचा दर रुपये १७००० क्विंटल गेला आहे. तर टोमॅटो पिकाला देखील 3500 रुपये क्विंटल पर्यंत काही ठिकाणी दर मिळत आहे.