राज्यात बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात लवकरच कडक कायदा आणणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

राज्यात बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात..

शेतकऱ्यांची शेतीसाठी बियाणे खरेदी करताना मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असते. बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांवर अजमीन पात्र गुन्हे दाखल करण्यासंदर्भामध्ये कायदा तयार करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

 पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली त्यावेळी ते विधिमंडळात बोलत होते.पावसाने ओढ दिल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासन कटिबंध असून त्यासाठी आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला आहे.  असे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केले.

येत्या आठवड्यामध्ये हवामान विभागाने चांगले पावसाची शक्यता वर्तवली आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून घ्यावी असे त्यांनी यावेळी सांगितले. 

बीटी बियाण्यांप्रमाणेच  इतर बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्या विरोधात कडक कारवाई राज्य सरकार करेल त्या अनुषंगाने विधिमंडळात कायदा आणला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *