महाराष्ट्र मध्ये पुढील पाच दिवसात पाऊस पंचमीचा अनुभव घेता येणार आहे.येत्या तीन दिवसांत कोकण भागात मुसळधार पाऊस पडेल. जसे की मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा,गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठवाडात देखील पुढील चोवीस तासात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता तर विदर्भात देखील मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढच्या येणाऱ्या चार-पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज बघितला तर मान्सूनचे विंड्स हे अरेबियन- सी मध्ये खूप ॲक्टिव आहेत. आणि ते आपल्या कोस्ट कडे ऑलमोस्ट 60 ते 65 किलोमीटर पर हवर्सच्या वेगाने येत आहेत, आणि त्यामुळे आपल्याला येणाऱ्या तीन चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण मधील रत्नागिरी ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील अनेक भागात दोन दिवसापासून हलक्या ते मध्यम पाऊस पडला आहे . तसेच ,पालघर, रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरी पडल्या.
मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील रायगड मधील माणगाव येथे सर्वाधिक 250 तर पेन येथे 221.3 मिलिमीटर पाऊस पडला पनवेल मध्ये 99.8 मिलिमीटर पाऊस पडला ,त्यामुळे धरणातील पाण्यामध्ये वाढ होऊ लागली आहे . पावसाचा जोर वाढल्यामुळे पुन्हा एकदा भात रोपे पुनर लागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.
खानदेशामधील जळगाव, नाशिक नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पावसाचा कमी अधिक जोर आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे .पुणे ,नगर, सातारा ,सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची स्थिती कायमच असली तरी तुरळ ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला आहे.
मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाचा शिडकावा झाला आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. तर हत्ता ३०.५ मिलिमीटर , कारखेली ३८.३, कंठेश्वर ४८.३, पूर्णा ३५.५,पाऊस पडला ज्यामुळे कापूस, सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांना मदत झाली. परंतु अनेक भागांत अजिबात पाऊस झालेला नाही म्हणून पिके संकटात आली आहेत.
याचा अर्थ खरीप शेतीचा हंगाम चांगला जात नाही की काय अशी स्थिती तयार झाली आहे. पेरण्यासाठी अजूनही दमदार पावसाची गरज आहे.