गावरान आंब्याची चव महागली, वाचा काय आहे दर….

गेल्या पंधरा दिवसापासून हिंगोली येथील बाजारपेठेमध्ये आंब्यांची आवक वाढली आहे , सध्या लंगडा, बादाम ,दशेरी, ७० ते ८० रुपये किलो तर गावरान आंबा १०० रुपये किलो प्रमाणे विकला जात आहे. गावरान आंब्याची आवक कमी असल्यामुळे हा इतर आंब्यापेक्षा महाग असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच आंबा बाजारात येत असतो . सध्या आंब्यांचा मौसम सुरू आहे त्यामुळे विविध प्रकारच्या कलमी आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात बाजारात होत आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे उपलब्ध झालेल्या आंब्याबरोबरच व्यापारी नांदेड तसेच इतर जिल्ह्यातून आंबे विक्रीसाठी आणत आहेत.

झाडांची संख्या कमी
पावसाचे कमी प्रमाण ,वाढती वृक्षतोड,यामुळे गावरान आंब्याच्या झाडांची संख्या कमी झाली आहे. अनेक वर्षापासूनची आंब्याची जुनी झाडे वाळून गेली आहे , काही तोडली गेली यामुळे गावरान आंब्याच्या झाडांची संख्या कमी झाली आहे.

इतर जिल्ह्यातून आंब्याची आवक
हिंगोलीच्या बाजारात सध्या स्थानिक आंब्यासह पश्चिम महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश,येथून आंब्याची आवक होत आहे.व्यापारी त्या भागातून आंबा विक्रीसाठी आणत आहेत. हा आंबा आणण्यासाठी वाहतुकीचा खर्च मोठा लागत असल्याने किरकोळ दरात आंब्याचे भाव वाढत आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये आवक वाढू शकते त्यानंतर दर कमी होतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

राज्यातील विविध बाजार समितीमधील आंब्यांची आवक आणि दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/05/2024
छत्रपती संभाजीनगरक्विंटल2674000120008000
श्रीरामपूरक्विंटल1405000110008000
सांगली -फळे भाजीपालाहापूसक्विंटल1413130065003900
मुंबई – फ्रुट मार्केटहापूसक्विंटल512590002000014500
नागपूरलोकलक्विंटल2429400045004375
मुंबई – फ्रुट मार्केटलोकलक्विंटल87986000100008000
राहतालोकलक्विंटल3200045003200
कामठीलोकलक्विंटल5150025002000
अमरावती- फळ आणि भाजीपालातोतापुरीक्विंटल210220032002700
नागपूरतोतापुरीक्विंटल2000330038003725

Leave a Reply